PM मोदींच्या घरी पालकांसहीत पोहोचला ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद! दोघांमधील चेसबोर्ड चर्चेत

PM Modi Praggnanandhaa Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदची भेट घेतली. या भेटीचे फोटो ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनेच सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. या वेळेस प्रज्ञाननंदचे आई-वडीलही त्याच्या सोबत होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या भेटीसंदर्भात पंतप्रधान मोदींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. पाहूयात भेटीतील काही खास क्षण...

| Sep 01, 2023, 08:01 AM IST
1/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत (FIDE Chess World Cup) अंतिम फेरी गाठणारा ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद (R Praggnaandhaa) हे नाव गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आहे.

2/10

3/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

जगातील अव्वल, मानांकित खेळाडूंना पराभूत करत चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

4/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

दुर्दैवाने अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदला अव्वल प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावं लागलं. तरीही वयाच्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारण्याची ऐतिहासिक कामगिरी प्रज्ञाननंदने केली आहे.

5/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

प्रज्ञाननंदचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्याची आणि त्याच्या पालकांची बुधवारी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

6/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी भेटून आनंद झाला," असं प्रज्ञाननंदने एक्सवर (ट्विटरवर) या भेटीचे फोटो शेअर करत म्हटलं आहे. 

7/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

यावेळेस पंतप्रधानांबरोबर प्रज्ञाननंद चर्चा करत असताना समोरच बुद्धीबळाचा पटही दिसून आला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतीय तरुण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रज्ञाननंद आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी त्याचं कौतुक केलं.

8/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

एका फोटोत पंतप्रधान मोदींनी प्रज्ञाननंदला मिळालेलं मेडल पाहताना त्याच्या दंडांना घट पकडत जवळ घेतल्याचंही दिसत आहे.

9/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

यावेळेस प्रज्ञाननंदबरोबर त्याचे आई-वडिलही होते. मोदींनी प्रज्ञाननंदच्या पालकांचंही कौतुक यावेळी केलं.

10/10

PM Modi meets chess prodigy Praggnanandhaa

"मला आणि माझ्या पालकांना तुम्ही ज्या प्रेरणादायी शब्दांमध्ये प्रोत्साहन दिलं त्यासाठी धन्यवाद," असंही प्रज्ञाननंद म्हणाला आहे.