ऐतिहासिक! PM मोदींना फ्रान्सने प्रदान केला सर्वोच्च सन्मान; पाहा पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो

PM Modi Awarded With Grand Cross of the Legion of Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर द्विपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली. मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही केलं. याच दौऱ्यामध्ये फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना, 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं असून या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

| Jul 14, 2023, 08:22 AM IST
1/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सने 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हा फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पंतप्रधान मोदी हे 'लीजन ऑफ ऑनर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहे.

2/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा सन्मान काही निवडक नेत्यांना मिळाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीच्या माजी चान्सलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोल घाली यांचा समावेश आहे.

3/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

मागील काही काळामध्ये पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या देशांनी दिलेल्या पुरस्कारांच्या यादीमध्ये आता 'लीजन ऑफ ऑनर'चाही समावेश झाला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींना जून 2023 मध्ये इजिप्तमधील ऑर्डर ऑफ द नाइल, मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीने कॅपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, मे 2023 मध्ये फिजीने कॅपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, मे 2023 मध्ये पलाऊ प्रजासत्ताकने एबाकल पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

4/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

फ्रान्सकडून मोदींना देण्यात आलेल्या या सन्मानाचे फोटो सोशळ मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी भूतानकडून ड्रुक ग्यालपो, 2020 मध्ये अमेरिकन सरकारचा लीजन ऑफ मेरिट, 2019 मध्ये बहरीनकडून किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेन्सा, 2019 मध्ये मालदीवने ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे.

5/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

फ्रान्सने मोदींना हा सन्मान देण्याआधीच रशियाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अॅण्ड्र्यू पुरस्कार प्रदान केला आहे. 2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने म्हणजेच युएईने ऑर्डर ऑफ जायद, 2018 मध्ये ग्रॅम्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन, 2016 मध्ये अफगाणिस्तानने स्टेट ऑर्ड ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान आणि 2016 मध्ये सैदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला आहे.   

6/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

पंतप्रधान मोदींसाठी एलिसी पॅलेसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या डिनरचं आयोजन केलं होतं.

7/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी पॅरिसमध्ये दाखल झाले. विमानतळावर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी मोदींचं स्वागत केलं.

8/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

पंतप्रधान मोदींनी काल पॅरिसमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. यावेळेस मोदींनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत असल्याचं सांगितलं. या परिवर्तनाचं नेतृत्व भारतामधील तरुण आणि मुली करत आहेत. आज संपूर्ण जगाला भारताकडून अपेक्षा आहेत असं मोदी म्हणाले.

9/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

भारतीयांना संबोधित करताना मोदींनी, मी एक संकल्प घेऊन वाटचाल करत आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भारतीयांसाठी समर्पित केला आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

10/10

Grand Cross of the Legion of Honour To PM Modi

मोदींना पाहण्यासाठी, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी भारतीयांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थिती लावली होती. या हॉलच्या बाहेरही भारतीयांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं होतं.