क्रिकेट जगतातील प्लेबॉय! 'या' खेळाडूंच्या गेम पेक्षा अफेअर्सचीच चर्चा जास्त होते

क्रिकेटपटूही मनोरंजन विश्वातील कलाकारांसारखे सेलिब्रिटी आहेत. क्रिकेटपटूंचे वैयक्तिक आयुष्य कधीही कोणापासून लपलेले नाहीये. अनेक क्रिकेटपटूची प्रतिमा ही प्लेबॉयसारखी झालेली आहे. 

Oct 02, 2024, 16:35 PM IST
1/9

क्रिकेट जगतातील प्लेबॉय! 'या' खेळाडूंच्या गेम पेक्षा अफेअर्सचीच चर्चा जास्त होते

2/9

क्रिकेटपटूही मनोरंजन विश्वातील कलाकारांसारखे सेलिब्रिटी आहेत.  क्रिकेटपटूंचे वैयक्तिक आयुष्य कधीही कोणापासून लपलेले नाहीये. अनेक क्रिकेटपटूची प्रतिमा ही प्लेबॉयसारखी झालेली आहे.   

3/9

मोहम्मद अजहरुद्दीन

मोहम्मद अजहरुद्दीन हा केवळ प्लेबॉय नव्हता तर त्याने आपल्या पहिल्या पत्नीची फसवणूक देखील केली होती. त्याने नौरीनशी लग्न केले असतानाच त्याने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीला डेट करायला सुरुवात केली. तिला दोन मुलगे असूनही संगीतासोबत लग्न करण्यासाठी त्याने नौरीनला घटस्फोट दिला. यानंतर, भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हिच्यासोबत त्याचे अफेअर असल्याची बातमी आल्यानंतर त्याने तिच्यासोबतही घटस्फोट घेतला. त्याने शॅनन मेरी तलवार यांच्याशी तिसरे लग्न केल्याचेही बोलले जाते.  

4/9

गेलला पार्टी आणि डान्स आवडते. याच कारणामुळे त्याचीही प्लेबॉयसारखी इमेज आहे. तो अनेकदा अनेक मुलींसोबत स्पॉट झाला आहे. (Photo Credit: Allysa Berridge/Instagram)

5/9

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल फार प्रसिद्ध आहे. 2009 मध्ये त्याची जोडीदार नताशा बेरेझशी  त्याने लग्न केले. नताशा जमैकाची फॅशन डिझायनर असून या जोडप्याला एक मुलगीही आहे. मात्र, गेलची इमेज आजही पार्टी बॉय अशी आहे.  (Photo credit: PTI)   

6/9

शेन वॉर्न आणि इंग्लिश अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले यांचे रिलेशन त्याकाळी फार चर्चेत होते. मात्र,  काही काळानंतर ते दोघे वेगळे झाले. रिपोर्ट्सनुसार, वॉर्नच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. (Photo Credit: Instagram) 

7/9

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर म्हणजे शेन वॉर्न. शेन वॉर्न यांच्या खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. पत्नी सिमोन कॅलाहानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, त्याने अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेला डेट केले होते. तो अनेकदा नवीन गर्लफ्रेंड्ससोबत स्पॉट झाला होता. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. (Photo Credit: ANI)  

8/9

इम्रान खान

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या काळातील सर्वात सुपरहिट क्रिकेटपटू होते. त्याकाळात त्याच्याबद्दल अनेक चर्चा होत होत्या.असे म्हटले जात होते की ते ज्या देशात खेळायला जातो तिथे तो एक गर्लफ्रेंड बनवायचे.  (Photo Credit: PTI) 

9/9

युवराज सिंग

युवराज सिंगच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, युवराजला अनेक मुलींचे क्रश म्हणून ओळखले जात होते. अगदी अभिनेत्री किम शर्मापासून ते दीपिका पदुकोण, आंचल कुमार ते अगदी प्रीती झिंटा हीच्यासोबतही नाव जोडले गेले. शेवटी तो  ब्रिटीश-मॉरिशियन मॉडेल, हेजल कीचसोबत लग्न करून सेटल झाला आहे. (Photo Credit: Instgram)