काजूंचं गाव म्हणून ओळखलं जातं भारतातील 'हे' ठिकाण; टोमॅटोपेक्षाही स्वस्त मिळतो सुका मेवा...

भारतात अशी एक जागा आहे जिथे काजू टोमॅटोपेक्षा ही कमी किंमतीत विकले जातात. 

Aug 06, 2024, 09:48 AM IST
1/8

सुक्या मेव्याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. सुक्यामेव्यातील पोषक घटकांमुळे मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. काजूच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो.   

2/8

महाराष्ट्रात काजूची शेती सर्वाधिकपणे कोकणात केली जाते. ओल्या काजूची उसळ आणि काजूची फेणी हे कोकणात अत्यंत आवडीने खाल्लं जातं. 

3/8

साधारणपणे बाजारात  काजूचा दर  1,000 रुपये प्रति किलो इतका आहे. काजूचं उत्पादन फार कमी होत असल्याने त्याचा दर देखील जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाला किलोने काजू विकत घेणं परवडत नाही.   

4/8

कोकणात काजूची लागवड केली जाते, मात्र कोकणापेक्षाही सर्वात जास्त काजूचं  झारखंड राज्यात केलं जातं. जामतारा जिल्ह्याला 'काजूंचं गाव'म्हणून ओळखलं जातं. 

5/8

देशात सर्वात जास्त  काजूची लागवड जामतारामध्ये केली जाते.  मागणी प्रमाणेच    पुरवठा होत असल्याने इथे काजू किरकोळ भावात विकले जातात.   

6/8

जामतारा जिल्ह्याची बाजारपेठ खास ओल्या काजूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओल्या काजूंच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मोठी गर्दी असते.   

7/8

जामतारामध्ये काजूची किंमत सुमारे 45-50 रुपये प्रति किलो आहे, तर प्रक्रिया केलेल्या काजूंची किंमत साधारणत: 150-200 रुपये प्रति किलो इतकी आहे. 

8/8

या शिवाय केरळमध्ये कोल्लम येथे देशातील 80 टक्के काजूची आयात निर्यात केली जाते. केरळला देखील काजूचं शहर म्हटलं जातं.