'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील शुभम-किर्ती झळकणार पुन्हा दिसणार एकत्र

समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

Apr 05, 2024, 21:42 PM IST

समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

1/8

प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. 

2/8

शुभम आणि किर्ती जोडी पोहोचली घराघरात

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

स्टार प्रवाहवरील 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून शुभम आणि किर्ती ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. यात शुभम हे पात्र अभिनेता हर्षद अतकरीने साकारले होते. तर किर्तीने अभिनेत्री समृद्धी केळकरची भूमिका साकारली होती. 

3/8

पुन्हा एकदा एकत्र दिसणार

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

आता लवकरच शुभम आणि किर्ती ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

4/8

सूत्रसंचालनात देणार साथ

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

'मी होणार सुपरस्टार' जोडी नंबर वनच्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला हर्षद अतकरी हा सूत्रसंचालनात साथ देणार आहे. 

5/8

स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे.  

6/8

सूत्रसंचालनही जोडीने सादर होणार

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

स्पर्धकांसोबतच सूत्रसंचालनही जोडीने सादर होणार आहे. समृद्धीसोबतच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात. 

7/8

सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडणार

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

'मन धागा धागा' मालिकेतील सार्थक आणि 'साधी माणसं' मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल. 

8/8

लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पाहण्याची मिळणार संधी

phulala sugandha maticha serial fame Actress samruddhi kelkar and actor harshad atkari starrer together in new show

समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पहाण्याची संधी मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचाद्वारे प्रेक्षकांना मिळणार आहे.