Photos: कारमध्ये S*x करताना चुकून गिअरला धक्का लागला अन्..; 2 कोटींच्या कारची काय अवस्था झाली पाहा

Intimate Couple In Car Accident: कारमध्ये काही खासगी क्षणांचा आनंद घेत असतानाच या दोघांपैकी एकाचा धक्का गिअरला लागल्यानंतर जे काही घडलं ते फारच विचित्र होतं. यानंतर जवळपास पुढील पाच तास संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. नेमकं घडलं काय आणि कुठे हे जाणून घेऊयात...  

| Sep 02, 2024, 11:06 AM IST
1/8

caraccident

'नजर हटी दुर्घटना घटी' हे वाक्य तुम्ही प्रवासादरम्यान रस्त्याच्या बाजूच्या पाट्यांवर अनेकदा वाचलं असेल. मात्र असाच एक विचित्र अपघात एका जोडप्याबरोबर घडला आहे. नेमकं झालं काय ते पाहूयात...

2/8

caraccident

कारमध्ये रोमान्स करणं एका जोडप्याला फारच महागात पडलं आहे. कारच्या मागील सीटवर लैंगिक संबंध ठेवत असताना चुकून गिअरला धक्का पडल्याने कार या दोघांसहीत थेट नदी पात्रात गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

3/8

caraccident

हा सारा प्रकार अमेरिकेमध्ये घडला असून ही कार थेट फिलाडेल्फिया नदीच्या पात्रात उतरली. रेंज रोव्हर 2020 मॉडेलच्या या कारचा हा अपघात झाला तेव्हा हे जोडपं कारमध्येच होतं. हा अपघात 28 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास फेअरमाऊंट पार्क जवळ झाला.  

4/8

caraccident

पोलिसांनी या प्रकरणामध्ये एनबीसी 10 ला दिलेल्या माहितीनुसार, रोमान्स करत असताना या दोघांपैकी कोणाच्या तरी शरीराचा स्पर्श गिअरला झाला आणि कार पुढे सरकू लागली व थेट नदीत पडली. कार नदीच्या काठावरुन थेट नदीपात्रात पडली.

5/8

caraccident

सुदैवाने यामध्ये कारमधील जोडप्याला कोणतीही दुखापत झाली नाही. कार पूर्णपणे पाण्यात बुडण्याआधीच त्यांनी आहे त्या अवस्थेत कारबाहेर उड्या घेतल्या. दोघेही पोहत नदीच्या काठावर आले.   

6/8

caraccident

कार नदी पात्रात पडल्यानंतर ती कुठे आहे हे तिच्या इमर्जन्सी लाइट्सवरुन समजत होतं. अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी कार नदीबाहेर काढण्यासाठी हलचाली सुरु केल्या. ही कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. 

7/8

caraccident

सकाळी सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर 9 च्या सुमारास म्हणजेच चार तासांनंतर ही कार बाहेर पोलीस आणि अग्निशामन दलाला बाहेर काढण्यात यश आलं. अपघातग्रस्त गाडीची भारतामधील चलनानुसार किंमत दोन कोटींच्या आसपास आहे.  

8/8

caraccident

कार नदीमधून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामधील जोडप्यावर आधी कोणताही गुन्हा किंवा चलान नसल्याने त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिलं आहे.