सारा आणि रियाची अतूट मैत्री

ड्रग्स सेवन प्रकरणी रियाने बॉलिवूडमधील २५ जणांचे नाव घेतले आहे. त्यामध्ये सारा अली खानचे नाव प्रथम स्थानी आहे.

Sep 12, 2020, 15:45 PM IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रिया सध्या तुरूंगामध्ये आहे. तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.  एनसीबीने मला ड्रग्सचे सेवन करत असल्याची कबुली देण्यास दबाव टाकल्याचं वक्तव्य तिने न्यायालयासमोर केलं होतं. ड्रग्स सेवन प्रकरणी रियाने बॉलिवूडमधील २५ जणांचे नाव घेतले आहे. त्यामध्ये सारा अली खानचे नाव प्रथम स्थानी आहे. तर सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रिया आणि सारा एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी असल्याचं दिसून येत आहे. सारा आणि रियाचे निवडक फोटो...

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6