3 वर्षांची असताना वडिल गेले, आईने मजूरी केली... आता ओळखली जाते टीम इंडिया प्रती झुलन गोस्वामी
Womens Team India : दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 वर्ल्ड कप (Womens T20 World Cup) सुरु आहे. स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला (Team India) इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला. सामना हरला असला तरी या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते टीम इंडियाची मध्यमगती गोलंदाज रेणूका ठाकूरने (Renuka Thackur). या सामन्यात रेणूकाने तब्बल 5 विकेट घेतल्या. रेणूकाला टीम इंडियाची प्रती झुलन गोस्वामी (Zulan Goswami) म्हणूनही ओळखलं जातं. विशेष म्हणजे पहिल्या महिला प्रीमिअर लीगमध्येही (WPL) रेणूकाने दीड कोटीचा टप्पा पार केला.
1/8
2/8
टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (England) सामन्यात रेणूका ठाकूर झळकली. 4 षटकात रेणूकाने केवळ 15 धावा देत तब्बल 5 विकेट घेतल्या. टी20 पाच विकेट घेण्याची ही तिची पहिली वेळ ठरलीय. टी20 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 30 सामन्यात तीने 30 विकेट घेतल्या आहेत.तर 7 एकदिवसीय सामन्यात तिच्या नावावर 18 विकेट जमा आहेत.
3/8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रेणूका ठाकूरवर पहिल्या महिला प्रीमिअर लीगमध्येही मोठी बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मोठी बोली लावत रेणूकाला आपल्या संघात घेतलं. रेणूकासाठी फ्रँचाईजीमध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. पण आरसीबीने तिच्यावर तब्बल 1.50 कोटींची बोली लावली.
4/8
5/8
6/8
7/8