हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा होतोय त्रास? करा 'हे' घरगुती उपाय

Winter Health Tips : हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकलाचा त्रास होतो. जर तुम्हालाही सर्दी -खोकलाचा त्रास होत असेल तर जाणून घ्या घरगुती उपाय...  

Jan 04, 2024, 18:35 PM IST

Winter Health Tips In Marathi : हिवाळा ऋतु म्हणजे ताप आणि व्हायरल. अशावेळी जर तुम्ही थोडे निष्काळजी असाल तर तुम्हाला सर्दी होते. सर्दी-खोकल्यामुळे संपूर्ण शरीर दुखते. याशिवाय छातीत कफ जमा झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. हंगामी आजारांमुळे तुम्हाला नेहमी डॉक्टरकडे जावे लागते. मात्र काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून थोडाफार आराम मिळू शकतो.  

 

1/6

हिवाळ्यात घसा खवखवण्याची समस्या सामान्य आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा.

2/6

रोज सकाळी कोमट पाण्याने गार्गल करा. कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गार्गल केल्यास हिवाळ्यात घसा खवखवण्याच्या समस्येपासून सहद सुटका मिळेल. 

3/6

रोज सकाळी एक चमचा मध 2-3 तुळशीच्या पानांसोबत खा. यामुळे थंडीची समस्या दूर होईल. असे केल्याने घासाच्या त्रासातून मुक्ती मिळू शकते.

4/6

घसा नेहमी उबदार कपड्याने झाकून ठेवा. थंड वारा लागणार नाही याची काळजी घ्या. तुमचे कान, मान आणि खांदे कधीही उघडे ठेवू नका.

5/6

घसा दुखत असेल तर मधूनमधून कोमट पाणी प्या. यामुळे घशातील संसर्ग दूर होतो आणि घसादुखीपासून आराम मिळतो.  

6/6

याशिवाय तुम्ही वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्याने विविध आजार बरे होतात. हिवाळ्यात वाफ घेतल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.