घरात खूप झुरळ झाले आहेत? 4 सेकंदात दिसेल परिणाम, करा 'हे' उपाय

Home Remedies For Cockroaches at Home:  जर तुम्ही झुरळांना घरातून पळवून लावण्यासाठी उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. जर तुम्ही हे घरघुती उपाय केला तर तुम्हाला 4 सेकंदात परिणाम दिसून येईल.   

Jan 04, 2024, 18:24 PM IST
1/7

घरतल्या झुरळ पळवून लावणे म्हणजे सर्वात अवघड काम. फवारणी केल्यानंतर तेवढ्याच पुरता परिणाम दिसून येतो, नंतर पुन्हा दिसून येतात. 

2/7

झुरळांना पळवून लावण्यासाठी सगळ्यात आधी  एका भांड्यात व्हिनेगर घ्या त्यात लवंग घाला. मग त्यात लिंबाचे साल घाला. नंतर यात अल्कोहोल असलेले हॅण्ड सॅनिटायझर घाला. हे सर्व व्यवस्थित ढवळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. बॉटलमधील हे द्रावण अशा ठिकाणी फवारा जिथे जास्त प्रमाणात झुरळांचे ये-जा असते.

3/7

बोरिक पावडर

बोरिक पावडरच्या छोट्या गोळ्या तयार करा आणि त्या गोळ्या तुमच्या स्वयंपाकघरात जिथे झुरळ येतात तिथे ठेवा. या गोळ्या झुरळे गायब होण्यास मदत करतील. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा किंवा महिन्यातून 20 वेळा करू शकता. जेणेकरून झुरळे घरी येणार नाहीत.  

4/7

तमालपत्र

तमालपत्राची पाने स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वापरली जातात. त्यासाठी अर्धा तमालपत्राचा चुरा बनवला. त्यानंतर घराच्या अशा बाजूला ठेवा जिथे झुरळ जास्त येतात.  

5/7

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा कोणत्याही स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो. एक कप पाण्यात बेकिंग सोडा आणि साखर यांचे मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण पुरेशा प्रमाणात घरात ठेवा.   

6/7

लवंग

लवंगाचा रंग झुरळांसारखाच असतो पण झुरळं कायमचे घालवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरतात. झुरळं कुठेही फिरत असतील तरी लवंग आसपासही येत नाहीत. तुम्ही स्वंयपाकघरात, बाल्कनी, ड्रॉवरमध्ये कुठेही लवंग ठेवू शकता. 

7/7

रॉकेल

जर घरात रॉकेल असेल तर याचे काही थेंब कापसाच्या बोळ्याला लावून तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. स्वयंपाकघरापर्यंत रॉकेल पोहोचणार नाही याची काळजी घ्या. कपाटात,बाल्कनीत तुम्ही रॉकेलमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे ठेवू शकता.