मुघलांशी संबंध, आत्म्याने पछाडले, 'या' अभिनेत्रीच्या मृत्यूने बॉलिवूड हदरले होते

शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. 

Soneshwar Patil | Jan 28, 2025, 13:05 PM IST
1/7

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री अशी होती जिने आपल्या राजेशाही शैलीने आणि सौंदर्याने बॉलिवूडवर राज्य केले होते. मात्र, तिच्या मृत्यूवर आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

2/7

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे नाव आहे परवीन बाबी. जी केवळ चित्रपटांमध्येच प्रसिद्ध नव्हती तर तिचे वैयक्तिक आयुष्य देखील रहस्यमय कथांनी भरलेले होते.

3/7

 1973 मध्ये परवीन बाबीने 'चरित्र' या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यासोबतच तिच्या सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 

4/7

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत तिने चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  त्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री होती. 

5/7

परवीन बाबीला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला भयानक गोष्टी दिसू लागतात. ज्यामध्ये तिला भूत-प्रेत दिसायचे असे नातेवाईकांनी सांगितले. 

6/7

इतकेच नाही तर परवीन बाबीचे पूर्वजही मुघल साम्राज्याशी संबंधित होते, जे तिच्या राजेशाही शैलीत दिसून यायचे. 

7/7

परवीनचा मृत्यू तिच्या आयुष्याइतकाच रहस्यमय होता. तीन दिवसांनंतर तिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये सापडला. तिच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरले. आजही तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x