कपूर कुटुंबातील 'या' सौंदर्यवतीला भेटण्यासाठी न्यायाधीशांनी थेट समन्स पाठवले; ती कोर्टात आली अन्...

Guess This Actress: बॉलीवूडमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांचे नाव आणि प्रसिद्धी इतकी होती की त्यांच्या चाहत्यांची कमतरता नव्हती.   

तेजश्री गायकवाड | Jan 28, 2025, 12:12 PM IST

Guess This Actress: बॉलीवूडमध्ये अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांचे नाव आणि प्रसिद्धी इतकी होती की त्यांच्या चाहत्यांची कमतरता नव्हती. 

 

1/7

बॉलिवूडच्या अशा अनेक सौंदर्यवती आहेत ज्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. इतकं की त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाला, मग ते लहान मूल असो वा म्हातारे, प्रत्येकालाच उत्सुकता असते. पण एकदा असे झाले की एका अभिनेत्रीला भेटण्यासाठी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी समन्स पाठवले होते. चला या सौंदर्यवतीबद्दल जाणून घेऊयात.   

2/7

सौंदर्यवतीचे वकील

माजिद मेमन हे त्या काळातील प्रसिद्ध वकील होते. ते आपण बोलत असलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रीचेही वकील होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींशी जोडले गेले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. तसेच ते कॉलेजच्या दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना ओळखतात. नौशाद साहब यांच्या घरी दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांसारख्या दिग्गजांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.   

3/7

ही सुंदरी कोण आहे?

ही सुंदरी दुसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहे. लोकांमध्ये आजही तिची क्रेझ आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी समन्सही पाठवले होते. त्यावेळी कोर्टात तिला बघायला अनेक लोक आले होते. ती गर्दी नियंत्रित करता येत न्हवती.     

4/7

माजिद मेमन यांचा खुलासा

ख्यातनाम ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी नुकताच हा खुलासा केला. माजिद यांनी अलीकडेच 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना त्यांच्या हायप्रोफाइल प्रकरणांबद्दल सांगितले. इतकेच नाही तर माजिद मेमनने त्यांच्या 'माय मेमरीज' या आत्मचरित्रात अशी अनेक गुपित प्रकाशित केली आहेत.

5/7

श्रीदेवी तिच्या करिअरच्या शिखरावर होती

मुलाखतीत माजिद यांनी श्रीदेवीच्या क्रेझबद्दल खुलेपणाने सांगितले. श्रीदेवीच्या केसमध्ये ते वकील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी श्रीदेवी करिअरच्या शिखरावर होती. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक फार वाट बघायची. 

6/7

न्यायाधीश श्रीदेवीचे मोठे चाहते निघाले

माजिद म्हणाले की, "न्यायाधीशांनाही श्रीदेवीला भेटायचे होते. मात्र तारखेला हजर राहण्यासाठी मी कोर्टात सूट मिळावी म्हणून अर्ज केला होता. पण तो फेटाळला गेला. त्यांनी स्वत: न्यायालयात यावे, अशी न्यायाधीशांची इच्छा होती. ती कोर्टात आल्यावर तिला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती."     

7/7

24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, बाथटबमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे दुबई पोलिसांनी नंतर सांगितले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x