PHOTO :10 वर्षी आई-वडिलांचं छत्र हरपलं, आजोबानी पोहोचवलं कुस्तीच्या आखाड्यात, 21 वर्षीय Aman Sehrawat चा खडतड प्रवास
Aman Sehrawat Untold Story : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताला पहिलं पदक अमन सेहरावत याला मिळालं आणि भारताच्या खात्यात सहावं पदक मिळालं. 21 वर्षीय अमनचा ऑलिम्पिकमधील प्रवास खूप खडतर होता.
1/7
2/7
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो भारतातील एकमेव पुरुष कुस्तीपटू होता. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर कुस्तीतील देशाची शेवटची आशा अमनवर होती आणि त्याने निराश केलं नाही. विशेष म्हणजे 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीमध्ये पदक जिंकलंय. अमनने पॅरिसमध्येही हा ट्रेंड सुरू ठेवला. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील बिरोहर या छोट्याशा गावात जन्मलेल्या अमन सेहरावतला 10 व्या वर्षी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा घाताला तोंड द्यावे लागले. त्याने एकापाठोपाठ आई वडिलांना गमावलं.
3/7
रिंगणात उतरण्यापूर्वी अमनने आयुष्यातील अडचणींविरुद्ध मोठी लढाई लढली. नातू अमनला खाऊ घालण्याऐवजी आजोबा मंगेराम सेहरावत यांनी त्याला आखाड्यात उतरवलं. आज अमनने कांस्यपदक जिंकल्याचा आनंदी व्यक्त करत ते म्हणाले की, 'लहानपणी मी अमनला या विचाराने वाढवले होते की एक दिवस माझा नातू माझं नाव जगात प्रसिद्ध करेल आणि त्याने ते करुन दाखवलं.'
4/7
5/7
अमनचे काका सुधीर सेहरावत सांगतात की. 'तो गावातील एक सामान्य शेतकरी आहे, पण अमनने त्याला खेळात प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या वडिलांची कधीही उणीव भासली नाही आणि संपूर्ण कुटुंबाने त्याची स्वप्नं पूर्ण केली.' अमनच्या काकांनी सांगितले की, 'आम्हाला गोल्ड मेडलची पूर्ण आशा होती, पण अमनने जे काही जिंकलं ते आमच्यासाठी सोनं आहे.'
6/7
अमनने हे पदक आईल-वडील आणि देशाला समर्पित केलंय. अमनने भारतातील सर्वात मोठ्या कुस्तीपटूंच्या शाळांमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ध्वज फडकावण्यापूर्वी अमन दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरला होता. U23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू देखील आहे.
7/7