Parenting Tips: लहानपणी मुलांनी केलेल्या 'या' हट्टाला कधीच नाही म्हणू नका; नंतर आयुष्यभर होईल पश्चाताप

लहान असताना मुलं आपल्याकडे वेगवेगळे हट्ट करत असतात. यातील प्रत्येक हट्ट पुरवणं आपल्याला शक्य नसतं. पण यातील एक हट्ट असा असतो ज्याला आई-वडिलांनी कधीच नाही म्हणू नये. 

| Mar 30, 2024, 19:42 PM IST

लहान असताना मुलं आपल्याकडे वेगवेगळे हट्ट करत असतात. यातील प्रत्येक हट्ट पुरवणं आपल्याला शक्य नसतं. पण यातील एक हट्ट असा असतो ज्याला आई-वडिलांनी कधीच नाही म्हणू नये. 

 

1/8

लहान असताना मुलं आपल्याकडे वेगवेगळे हट्ट करत असतात. यातील प्रत्येक हट्ट पुरवणं आपल्याला शक्य नसतं.   

2/8

पण यातील एक हट्ट असा असतो ज्याला आई-वडिलांनी कधीच नाही म्हणू नये.   

3/8

लहान असताना मुलांना पालकांचा वेळ हवा असतो. यासाठी ते आपल्याबरोबर खेळण्याचा, फिरायला जाण्याचा हट्ट करत असतात.  

4/8

पण वेळेअभावी, व्यस्त असल्याने किंवा काही वेळेला इच्छा नसल्याने आई-वडील मुलांना नकार देतात. अशावेळी मुलांनी मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टीत व्यग्र केलं जातं.   

5/8

पण एक वेळ अशी येते जेव्हा मुलं मोठी होतात आणि त्यांना पालकांच्या वेळेची अजिबात गरज नसते.   

6/8

मुलांनी आपल्या शेजारी बसावं, बोलावं, बाहेर जेवायला किंवा फिरायला यावं असं पालकांना कितीही वाटलं तरी तेव्हा परिस्थिती उलट असते.   

7/8

मुलं मोठी झाली असल्याने नवे मित्र, नवं जग त्यांना आकर्षित करत असतात. अशावेळी पालक हे दुय्यम स्थानी जातात. आता ते आपलं बोट धरुन चालण्याच्या पलीकडे पोहोचलेलं असतं.   

8/8

त्यामुळे जेव्हा मूल तुमच्याकडे वेळ मागत असतं तेव्हा अजिबात नाही म्हणू नका. कारण उद्या तुम्ही त्याच्याकडे वेळ मागत असाल तेव्हा तो नाही म्हणत असतो.