हॉट हॉट उन्हाळ्यात कुल कुल आनंद देणारा हा रेल्वे प्रवास तुम्ही अनुभवलाय का ?

उन्हाळ्याच्या सुट्या, मामाचं गाव आणि ट्रेनमधून दिसणारे डोंगर घाट हे समीकरण प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचं आहे. काळ बददला तसं सुट्यांमध्ये फिरायला जाण्याचं प्लॅनिंग ही बदललं. यंदा उन्हाळ्याच्या  सुट्यांमध्ये जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर देशातल्या या थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या.   

Apr 02, 2024, 16:09 PM IST

एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यातच मुलांच्या परीक्षा संपून सुट्या लागतात. जर या सुट्यांमध्ये तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचे नियोजन करत असाल तर हिमाचल प्रदेश आणि अन्य ठिकाणांचा नक्की विचार करु शकता. 

1/7

दार्जिलिंग

देशातल्या थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे दार्जिलिंग. पश्चिम बंगालमधील हे ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी आहे. असं म्हणतात की भारत पारतंत्र्यात इंग्रजांना महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील उन्हाचा तडाखा सहन होत नसे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात इंग्रज इथे येऊन विश्रांती घेत असतं. 

2/7

दार्जिलिंग पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेलं टायगर हिलवरून सूर्योदय पाहण्यास जगभरातून पर्यटक येत असतात. दार्जिलिंगच्या जंगलातून होणारी ट्रेन सफर निसर्गप्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.   

3/7

कांगडा घाट रेल्वे मार्ग

फक्त निसर्गसौंदर्यच नाही तर नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा हा परिसर आहे. खास जंगल सफारीकरीता पर्यटक या ठिकाणी येणं पसंत करतात. कांगडा रेल्वे स्थानकातून सुरु होणारी ही जंगल सफारी पठाणकोट,पंजाब ते हिमाचल प्रदेश पर्यंत होते. निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटण्यासाठी या ठिकाणाी जाण्याचा प्लॅन तुम्ही करु शकता.   

4/7

कालका ते शिमला

हरीयाणा आणि  हिमाचल प्रदेश जोडणारी ही रेल्वे नॅरो गेजवर धावते. कालका ते शिमला 96 किलोमीटरचं अंतर 5 तासांत पार करते. या रेल्वेचं प्रमुख आकर्षण म्हणजे ही संपूर्ण प्रवासात  डोंगर, दऱ्या आणि घनदाट जंगलची सफारी अनुभवण्यास मिळते.  

5/7

जम्मू ते बारामुल्ला

भारताचं नंदनवन म्हणून काश्मीरला ओळखलं जातं. जम्मू ते बारामुल्ला हा रेल्वे प्रवास अनुभवण्यासाठी जगातील विविध कानाकोपऱ्यातून पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. हा रेल्वेचा प्रवास नयनरम्य असला तरी हृदयात धडकी भरवणारा आहे. अॅडव्हेंचर करण्यासाठी निसर्गप्रेमी जम्मू ते  बारामुल्ला हा रेल्वे प्रवास अनुभवण्यास येत असातात.   

6/7

कन्याकुमारी ते त्रिवेन्द्रम

भारताचं दक्षिण टोक म्हणजे कन्याकुमारी. अरबी समुद्र, बंगलचा उपसागर आणि हिंदी महासागर या तीनही महासागरांना पाहण्यासाठी खास पर्यटक  कन्याकुमारी ते त्रिवेन्द्रम रल्वे सफरी करण्यासाठी येतात. हिरवीगीर वनराई, सुर्यास्त झाल्यावर आकाशात दिसणारे विविध रंग आणि अथांग समुद्राचं विलोभनीय दृष्य हा निसर्गाचा अविष्कार अनुभवण्यासाठी कुटुंबासोबत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

7/7

मेट्टुपालयम ते ऊटी 

विलोभनीय डोंगर, दऱ्या, आणि हिरव्यागार जंगलाची सफर घडवणारी मेट्टुपालयम ते ऊटी  ही टॉय ट्रेन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. विविध पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आवर्जून या जंगलसफारीचा आनंद घेण्यासाठी येतात.