Palmistry X Signs: फक्त तीन टक्के लोकांच्या हातावर असतं 'हे' अक्षर; सूर्याप्रमाणे उजळतं नशीब

Palmistry X Symbol : हातावरच्या रेषा अनेकदा आपला स्वभाव दर्शवतात. तसंच आपल्या नशीबाबद्दलही सांगत असतात. तुम्ही जर नीट पाहिलं तर आपल्या हाताच्या रेषांमध्ये काही चिन्हं निर्माण होत असतात. यामध्ये काही चिन्हं ही एखाद्या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतात. पण त्यांचा अर्थ काय असतो? हा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे अक्षर एकीकडे तुमचं नशीब उजळतं तर दुसरीकडे अनेकदा तुमच्या चांगल्या नशीबात बाधाही आणतात.   

May 10, 2023, 16:13 PM IST
1/7

Palmistry: हातावरच्या रेषा अनेकदा आपला स्वभाव दर्शवतात. तसंच आपल्या नशीबाबद्दलही सांगत असतात. तुम्ही जर नीट पाहिलं तर आपल्या हाताच्या रेषांमध्ये काही चिन्हं निर्माण होत असतात. यामध्ये काही चिन्हं ही एखाद्या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतात. पण त्यांचा अर्थ काय असतो? हा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे अक्षर एकीकडे तुमचं नशीब उजळतं तर दुसरीकडे अनेकदा तुमच्या चांगल्या नशीबात बाधाही आणतात.   

2/7

Palmistry X Symbol

तुम्ही नीट पाहिलं तर काही लोकांच्या हातावर X अक्षर असतं. फक्त तीन टक्के लोकांच्या हातावर हे चिन्हं असतं.  

3/7

ज्या लोकांच्या हाताच्या रेषांमधून X अक्षर तायर होतं त्यांना प्रतिष्ठा मिळते. तसंच त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. तसंच ज्या लोकांच्या दोन्ही हातांवर हे अक्षर असतं, ते असं एखादं मोठं काम करतात जे त्यांच्यानंतरही लोक लक्षात ठेवतात.  

4/7

ज्या व्यक्तीच्या गुरू पर्वताच्या रेषेवर हे अक्षर असते, त्याच्या आयुष्यात कधीतरी भाग्य असं उजळतं की त्याला त्याला धन, मान-सन्मान सर्व काही मिळतं.  

5/7

जर हे अक्षर तुमच्या भाग्यरेषेवर किंवा तिच्या बाजूला असेल तर ते अशुभ आहे. भाग्यरेषेवर हे चिन्ह असणं करिअरमध्ये अडथळा ठरु शकतं. एखाद्या व्यक्तीला त्याचे कुटुंब, मित्र यांच्या नाराजीलाही सामोरं जावं लागतं.  

6/7

तळहाताच्या रेषांमध्ये जी सर्वात वरची रेषा असते त्यात जर हे अक्षर तयार होत असेल ते खूप धोकादायक ठरू शकतं. वरच्या रेषेवर हे अक्षर तयार झाल्यामुळे व्यक्तीला मनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.  

7/7

Palmistry

जर एखाद्या ह्रदयरेषेवर हे चिन्हं तयार होत असेल तर त्याचं आर्थिक नुकसान होतं. तसंच त्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावा सहन करावा लागतो.