Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

Feb 10, 2020, 07:42 AM IST
1/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

Oscars 2020  ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात होत असतानाच डॉल्बी थिएटरच्या बाहेर पावसानेही सुरुवात केली. वातावरणात झालेल्या या हलक्याश्या बदलातच इथे ऑस्करच्या रेड कार्पेटवर सुरुवात झाली ती म्हणजे एका अद्वितीय अशा सोहळ्याची.  महागडे, डिझायनग गाऊन आणि सूटबूट अशा एकंदर लूकमध्ये ऑस्करच्या रेड कार्पेटवर हॉलिवूड कलाकरांनी येण्यास सुरुवात केली. यामध्ये विशेष म्हणजे प्रत्येक अभिनेत्रीचा अंदाज पाहण्याजोगा होता. स्टाईल स्टेटमेंटचा अनोखा नजराणाच यावेळी पाहता आला. 

2/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

मागील वर्षी ऑस्कर पुरस्काराची मानकरी ठरलेली Regina King पावडर पिंक या रंगाच्या छटेतील गाऊनमध्ये सर्वांचं लक्ष वेधून गेली. तर, Idina Menzel ही गुलाबी रंगाची गडद छटा असणाऱ्या गाऊनमध्ये दिसली. 

3/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

ऑस्कर नामांकन प्राप्त Laura Dern यावेळी अरमानी प्राईव्ह गाऊनमध्ये दिसली. तर, Once Upon A Times In Hollywoodमधील बालकलाकार ज्युलिया बुटर्सही यावेळी सुरेख दिसत होती. 

4/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

Janelle Monae ही ऑस्करच्या रेड कार्पेटवर हूड असणारा एक हिरेजडित गाऊन घालून आली होती. Rebel Wilson यावेळी सोनेरी रंगाच्या एका गाऊनमध्ये दिसली. ज्याला एका चोकरची जोड दिली होती. 

5/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

Sandra Ohच्या गाऊनची शानही वेगळीच होती. Maya Rudolph ने यंदाच्या वर्षी पूर्ण बाह्यांच्या, लेअर्ड स्लीव्ह्स असणाऱ्या गाऊनला पसंती दिली होती. 

6/6

Oscarsच्या रेड कार्पेटवर 'फॅशन का है ये जलवा'....

ऑस्करच्या सोहळ्याच परफॉर्मन्ससाठी सज्ज असणारी बिली आयलीश यावेळी पँट सूटमध्ये दिसली.