Onion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली. 

Mar 04, 2023, 15:31 PM IST

Onion News : देशात कांद्याचे उत्पादन वाढत असताना भाव मिळत नसल्यानं शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी जोर धरु लागली. 

1/5

कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं

कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं

Onion : कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.

2/5

कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध

कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध

कांद्यानं शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध लादले जात असल्यानं त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे.

3/5

कांदा निर्यातवाढ झाली नाही

कांदा निर्यातवाढ झाली नाही

दहा वर्षानंतरही कांद्याची अपेक्षित निर्यातवाढ झालेली नाही.

4/5

देशातही कांद्याचे भाव कोसळले

देशातही कांद्याचे भाव कोसळले

आंतरराष्ट्रीय बाजारात भारती कांद्याची मागणी कमी होऊ लागलीये. त्यामुळे देशातही कांद्याचे भाव कोसळू लागलेत.

5/5

कांद्यानं शेतकऱ्यांना रडवले

कांद्यानं शेतकऱ्यांना रडवले

एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन वाढत असताना भाव मिळत नसल्यानं शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी जोर धरु लागली.