प्रवासाशी संबंधित शुभ-अशुभ संकेत तुम्ही मानता का? तर 'ही' बातमी जरूर वाचा

कोणत्याही प्रवासाला जात असताना अनेकदा आपल्याला असे काही संकेत मिळतात, ज्यांना आपण शुभ आणि अशुभ असं मानतो. प्रवासाशी संबंधित असेच काही संकेत जाणून घेऊया.

Mar 25, 2023, 21:28 PM IST
1/5

शकुन शास्त्रामध्ये, आपल्या जीवनाशी संबंधित असे संकेत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ गोष्टी तुम्ही ओळखू शकता. 

2/5

जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि एखादी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

3/5

प्रवासाला निघण्यापूर्वी फुटलेला आरसा दिसला तर ते अशुभ मानलं जातं. अशा परिस्थितीत, प्रवास पुढे ढकलणं योग्य ठरेल. किंवा मनातल्या मनात गणपतीचं स्मरण करा आणि मग बाहेर पडा.

4/5

जर तुम्ही प्रवासासाठी बाहेर जात असाल उकळलेलं दूध सांडलं तर ते अशुभ मानलं जातं. अशावेळी भगवान शिव यांचं नाव घ्या किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

5/5

जर तुम्ही कोणता प्रवास करणार असाल आणि तुम्हाला मंदिराचा पुजारी किंवा पिवळे कपडे घातलेली महिला दिसली तर ते शुभ चिन्ह मानलं जातं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि शकुन शास्‍त्रामधील माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)