ओट्सपासून बनवा पौष्टिकतेने परिपूर्ण अशा लंचबॉक्स रेसिपी

मुलांसाठी जेवणाचा डब्बा बनवणं फार कठीण असतं. रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याबरोबरच त्यांच्या पोषकमूल्यांची देखील काळजी घ्यावी लागते.त्यामुळे मुलांना काहीतरी हलकं आणि पौष्टिक बनवून देण्याची जबाबदारी पालकांची असते. 

Aug 05, 2024, 17:08 PM IST
1/7

ओट्सच्या या रेसिपी बनवायला सोप्या तर आहेतच पण त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे देखील आहेत.या 3 ओट्सच्या रेसिपी तुम्ही मुलांसाठी बनवू शकता.

2/7

मसाला ओट्स

एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून जिरे टाकून फोडणी द्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या  आणि कांदा सोनेरी होईपर्यंत परतळून घ्या. टोमॅटो आणि मीठ घालून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्या. त्यानंतर ला तिखट आणि हळद टाकून चांगल मिसळून घ्या. हे सर्व झाल्यानंतर ओट्स ,4 कप पाणी आणि कोथिंबीर टाकून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्या.   

3/7

ओट्स डोसा

भिजवलेली उडीद डाळ, भिजवलेले मेथीचे दाणे, ओट्स आणि  1 कप पाणी घालून बारीक करून 7 ते 8 तास ते पीठ आंबायला ठेवा. त्यानंतर  मीठ घालून मिक्स करावे आणि नॉनस्टिक पॅनवर तेल पसरवून घडाळ्याच्या दिशेने ते पीठ पसरवा.त्यानंतर 2मिनिटे शिजवून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. 

4/7

ओट्स पॅनकेक्स

एका भांड्यात 1 कप ओट पीठ, ½ कप किसलेले गाजर ,½ कप बारीक चिरलेला पालक , बारीक चिरलेली कोथिंबीर , 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ ,1½ टीस्पून तेल  घालून सर्व एकजीव करून घ्या.त्यानंतर नॉनस्टिक पॅन गरम करून थोडसं तेल लावून तयार केलेले पीठ पॅनवर घाला. 2 ते 3 मिनिट शिजवून घेतल्यावर दही आणि पुदीनाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.   

5/7

ओट्स मिल्कशेक

एक कप थंड दूधामध्ये केळी, टोस्टेड ओट्स, चॉकलेट सिरप ,दालचिनी पावडर आणि साखर टाकून मिक्सरमध्ये  चांगले मिक्स करून घ्या. हा मिल्कशेक बनवायला सोपा त आहेच त्याचबरोबर मुलांसाठी पौष्टिक देखील आहे.   

6/7

ओट्स पुडिंग

एका भांड्यामध्ये फ्रेश क्रिम दूध उकळेपर्यंत गरम करा. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले बदाम आणि साखर टाका. त्यानंतर काही मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये थोड तूप घालून काजू ,बेदाणे आणि  ओट्स भाजून घ्या. आता सर्व घटक दुधात मिसळा. दुध घट्ट होऊ लागले की गॅस बंद करून त्यात वेलची पूड टाका आणि सर्व्ह करा. 

7/7

ओट्स चिवडा

एका पॅनमध्ये ओट्स मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. त्याच कढईत एक चमचा तेल टाकून गरम तेलात हळद, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या.त्याच पॅनमध्ये पूर्वी भाजलेल्या सर्व साहित्यांसह भाजलेले पांढरे तीळ टाका. आता त्यात हलके मीठ आणि साखर टाकून गॅस बंद करा. वरून हिरवी कोथिंबीर कापून सजवा आणि सर्व्ह करा.