आता घरी बसून बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर बदलू शकता, 'या' स्टेप्स करा फॉलो

Bank Account : आता घरी बसून तुम्ही तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.

Surendra Gangan | Jul 06, 2023, 13:35 PM IST
1/9

Bank Account Number Change:  ता तुम्ही घर बसल्या बँक खात्याचा तुमचा मोबाईल क्रमांक बदलू शकता. बर्‍याच वेळा, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरमध्ये काही समस्यांमुळे तो कोणीतरी बंद करतो. त्यानंतर नवीन मोबाईल नंबर घेतला जातो. हा नवीन क्रमांक बँक खात्याशी लिंक कररायचे टेन्शन असते. त्यासाठी बँकेत जा. पण आता त्याची गरज नाही.

2/9

अनेकवेळा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलता. त्यानंतर तुम्ही तो तुमच्या खात्यातही बदलू शकता आणि तेही घरी बसून. बँकेत तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या पुढील प्रमाणे आहेत.

3/9

देशातील सर्वात मोठी बँक SBI बद्दल सांगायचे तर, जुन्या आणि नवीन मोबाइल नंबरद्वारे, एटीएमच्या मदतीने नेट बँकिंगद्वारे आणि बँकेत जाऊन मोबाईल नंबर बदलण्याचा पर्याय आहे. प्रत्येक बँकांमध्ये जवळपास समान प्रकारच्या पद्धती आहेत.

4/9

घरी बसून मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता. जर तुमचे नेट बँकिंग खाते असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे घरी बसून तुमच्या बँक खात्याचा मोबाईल नंबर बदलू शकता. जर आपण एसबीआयबद्दल सांगायचे झालेतर यासाठी तुम्हाला बँकेच्या नेट बँकिंग वेबसाइट www.onlinesbi.com वर जावे लागेल . यानंतर, जेव्हा तुम्ही तुमचे खाते लॉग इन करायचे असेल तेव्हा तुम्हाला येथे प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.

5/9

त्यानंतर Personal Detail वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोफाइल पासवर्ड टाकावा लागेल. ते सबमिट केल्यावर, तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी आणि जुना नंबर दिसेल. ज्यामध्ये मोबाइल नंबर बदलण्याचा पर्यायदेखील दिसेल. दिलेल्या सूचनांचे पालन करुन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलावा लागेल.

6/9

ओटीपीद्वारे (OTP) पडताळणी करावी लागेल. जर तुमच्याकडे नवीन आणि जुने दोन्ही मोबाईल नंबर असतील, तर तुम्ही दोन्ही मोबाईल नंबरवर By OTP चा पर्याय निवडा आणि Proceed वर क्लिक करा. तुमच्याकडे डेबिट कार्ड असलेले खाते निवडा.

7/9

बँक खात्याशी लिंक केलेल्या सर्व बंद आणि सुरु असलेल्या एटीएम कार्डचे तपशील दर्शविणारे पेज उघडेल. येथे निवडून सध्या सक्रिय असलेल्या एटीएम कार्डची पुष्टी करा. निवडलेल्या एटीएम कार्डचा क्रमांक पुढील स्क्रीनवर दिसेल. तपशील भरुन, संबंधित बॉक्समधील मजकूर बॉक्समध्ये दिलेला मजकूर भरा आणि Proceed वर क्लिक करा.

8/9

जुन्या आणि नवीन दोन्ही नंबरवर OTP पाठवला जाईल. यानंतर 567676 वर < 8 अंकी OTP > < 13 अंकी संदर्भ क्रमांक > ACTIVATE या दोन्ही मोबाइल क्रमांकांवरुन चार तासांत एसएमएस करावा लागेल. नवीन मोबाईल क्रमांक सक्रिय होईल.

9/9

जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत नसाल तर तुम्ही बँकेला भेट देऊन तुमचा खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन मोबाईल नंबर बदलण्याचा फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला तुमच्या पासबुक आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी द्याव्या लागतील. यानंतर बँक तुमचा मोबाईल बदलेल.