'या' प्राण्याच्या रक्ताची किंमत ऐकून 'रक्त आटेल' , रक्त नाही तर निळं सोनंच

पृथ्वीतलावरील अधिकतर सजीवांच्या रक्ताचा रंग लाल असतो . पण या प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा आहे .याच्या रक्ताचा नुसता रंगच नाही तर किंमत पण वेगळीच आहे . 

Sep 15, 2024, 19:04 PM IST

अपघाताच्यावेळी , वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा अन्य कारणांसाठी रक्त चढवायची वेळ येते . दवाखान्यात रक्त पिशवी साधारण 500 ते 1000 रु. च्याआत मिळुन जाते . पण एक असा प्राणी आहे ज्याचे रक्त विकत घेण्याचा विचारसुद्धा झेपणार नाही. या प्राण्याच्या एक लिटर रक्तासाठी लाखोंत किंमत मोजावी लागाते . 

 

1/8

गगनचूंबी किंमत

पृथ्वीतलावरील अधिकतर सजीवांच्या रक्ताचा रंग लाल आहे . पण काही प्राण्यांच्या रक्ताचा रंग पिवळा , हिरवा असा सूद्धा असतो . असे बरेच आर्श्चर्यजनक प्राणी जगाच्या कोपऱ्या- कोपऱ्यातून पहायला मिळतात .  या प्राण्याच्या रक्ताचा रंग तर वेगळा आहेच , पण रक्ताची किंमतसूद्धा गगनचूंबी आहे . 

2/8

हार्सशू क्रॉब

या प्राण्याचे नाव हार्सशू क्रॉब आहे . हा कोणताही अवाढव्य प्राणी नसून , एक खेकड्याचा प्रकार आहे . या प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा असतो . या निळ्या रक्तात भरपूर गुणधर्म आहेत . 

3/8

रक्तात विशिष्ट पदार्थं

हार्सशू खेकड्याचे रक्त वापरासाठी साठवून ठेवले जाते . याच्या रक्ताचा वापर वैद्यकीय साहित्य बनवण्याच्या प्रक्रियेत केला जातो . याच्या रक्तात हीमोसायनिन नामक पदार्थं असतो आणि त्याच पदार्थामुळे हार्सशूच्या रक्ताचा रंग निळा होतो . 

4/8

प्राचीन प्राणी

असं म्हटलं जात की, हा हार्सशू क्रॉब डायनासोरपेक्षाही जूना आहे . काही या विधानाचा विरोध करतात . नॅचरल हिस्ट्री म्यूझियमच्या हिशोबाने हा प्राणी 45 कोटी वर्ष जूना आहे .

5/8

खेकड्याची प्रजाती

हा प्राणी खेकड्याचाच एक प्रकार आहे . दिसायलासूद्धा तो सामान्य खेकड्यासारखाच असतो . हार्सशू क्रॉबला कासवासारखे कवच असते आणि एक शेपटीसूद्धा असते .  

6/8

निळ सोनं

हार्सशू क्रॉबचं रक्त म्हणजे निळं सोनंच . स्टडी डॉट कॉमने दिलेल्या माहितीनूसार , हार्सशूच्या एक लिटर रक्ताची किंमत 15 हजार डॉलर म्हणजे 12 लाख रुपये आहे . 

7/8

रक्तापासून औषध

हार्सशू क्रॉबच्या रक्तापासून बनलेल्या , औषधांची किंमत खुप जास्त असते . मिळालेल्या माहितीनूसार, हार्सशूच्या रक्तात लिमुलस अमीबोसाइट लाइसेट नावाचे प्रोटीन असते . हा पदार्थं मानवासाठी उपयोगी आणि जीव घेणासूद्धा आहे . 

8/8

दुर्मिळ प्राणी

हार्सशू खेकडा अमेरीकेतील अटलांटीका समुद्र किनाऱ्यावर अढळतो . या प्राण्याच्या प्रजननानंतर 10 ते 30 खेकडेच जगतात . हा खेकडा फार क्वचित बघायला मिळतो . त्यामुळेच त्याचे रक्त एवढे महाग आहे .