Northern Lights : निसर्गाची किमया! सौर वादळामुळे पृथ्वीवर उतरला स्वर्ग, पाहा PHOTOS

Northern lights glow in the sky : सूर्याच्या आतमध्ये होत असलेल्या मोठी हालचालीमुळे एक मोठे चुंबकीय सौर वादळ शुक्रवारी पृथ्वीवर धडकलं. 

Saurabh Talekar | May 11, 2024, 15:40 PM IST

Solar storm hits Earth : नॉर्दर्न लाईट्सचे मनमोहक परिणाम उत्तर ध्रुवाजवळ रात्री अवकाशात रंगेबीरंगी प्रकाश पहायला मिळाला.

1/7

ब्रिटनच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर असलेल्या एसेक्स, केंब्रिजशायर आणि वोकिंगहॅममध्ये नॉर्दर्न लाइट्स स्पष्टपणे दिसले.

2/7

एवढंच नाही तर केंट, हॅम्पशायर, स्वीडन आणि लिव्हरपूलमध्येही हा मनमोहक प्रकाश दिसून आला.

3/7

नॉर्दर्न लाइट्स पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. नॉर्दर्न लाइट्स आयर्लंडमध्येही दिसले आहेत, असं एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर म्हटलं आहे.

4/7

नॉर्दर्न लाईट्स ही एक भौतिक घटना आहे जी जेव्हा सौर वारे सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा उद्भवते. ऑक्सिजन आणि नायट्रोजन सारख्या वायूंशी आदळतात.

5/7

नॉर्दर्न लाइट्स साधारणपणे जमिनीपासून 80 ते 500 किमी उंचीवर आढळतात.  

6/7

आकाशात हिरवा, पिवळा, लाल किंवा नारिंगी प्रकाश दिसतो.

7/7

नॉर्दर्न लाइट संपूर्ण रशियामध्ये, विशेषत: मॉस्को प्रदेशात, तसेच सेराटोव्ह आणि व्होरोनेझमध्ये आणि दक्षिण सायबेरियामध्ये विस्तारलेले दिसत होते.