चुकीला माफी नाही! ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकलेल्या खेळाडूंना नॉर्थ कोरियात मिळते अशी भयानक शिक्षा

North Korea Olympic Player Punishment : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता सोहळा नुकताच पार पडला. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता खेळाडू मायदेशी परतले आहेत. मात्र, नॉर्थ कोरियाच्या खेळाडूंना मायदेशी परतताना धास्ती घेतली आहे.

Saurabh Talekar | Aug 13, 2024, 00:26 AM IST
1/5

नॉर्थ कोरिया

नॉर्थ कोरियाच्या एकूण 16 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 6 खेळाडूंना पदक जिंकला आलंय. यामध्ये 4 कांस्य तर 2 रौप्य पदकांचा समावेश आहे. 

2/5

किम जोंग उन

नॉर्थ कोरियामध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची सन्मान केला जातो. स्वत: किम जोंग उन त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना भेटवस्तू देखील देतो.

3/5

शारिरीक परिश्रम

पण ज्यांना पदक जिंकता आलं नाही, त्याचं काही खरं नाही. पदक जिंकता आलं नाही तर खेळाडूंना शिक्षा दिली जाते. तेही शारिरीक परिश्रमाची...

4/5

कोळशाच्या खाणीत काम

मागील ऑलिम्पिक्समध्ये ज्या खेळाडूंना पदक जिंकला आलं नव्हतं त्यांना खराब राहणीमान असलेल्या घरात ठेवलं गेलं. तसेच खेळाडूंना कोळशाच्या खाणीत कामाला पाठवलं जातं, अशी देखील माहिती समोर आली होती. 

5/5

सेल्फी महागात पडणार?

दरम्यान, नॉर्थ कोरियाचे खेळाडू आणि साऊथ कोरियाच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकवेळी एक सेल्फी घेतला होता. त्यावर आता रागावलेल्या किम जोंग उनचा निर्णय काय असेल? यावर सर्वांचं लक्ष आहे.