ना चिकन, ना पनीर, ना इटालियन; विराट-अनुष्काने मारला 'या' पदार्थांवर ताव, Photo Viral
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या सर्वात आवडीच्या पदार्थांवर ताव मारला. या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नेहा चौधरी
| Nov 09, 2024, 10:34 AM IST
1/7
विराट कोहली अनुष्का शर्मासोबत भारतात आहे. न्यूझीलंडसोबत नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेनंतर विराट आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पण, ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी तो अनुष्कासोबत काही सुंदर क्षणांचा आनंद घेताना दिसून येत आहे. नुकतेच दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते. जिथे दोघांनी हेल्दी फूडचा आस्वाद घेतला.
2/7
3/7
4/7
या जोडप्याने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबत हसताना एक फोटोही क्लिक केला आहे. यावेळी दोघेही कॅज्युअल आउटफिटमध्ये डोक्यावर कॅप घातलेले दिसले. रेस्टॉरंट स्टाफसोबत पोज देताना विराटने अनुष्काला खांद्याला धरून ठेवला होता. बेने बॉम्बेने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनुष्का आणि विराटचे चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही कॅज्युअल आउटफिटमध्ये पाहिला मिळत आहेत.
6/7