Share Market: एका दिवसातच बंपर फायदा? 'हे' अफलातून शेअर्स आहेत तरी कोणते...
Share Market: सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे त्यामुळे बऱ्याच वेळा अशा परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये अनेक चढउतारही पाहायला मिळत असतात कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे यंदा घसरलेल्या मार्केटकडे पाहता तुम्ही कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तेव्हा जाणून घेऊया तुम्ही कुठे आणि कशी गुंतवणूक करू शकता ज्यात तुम्हाला एका दिवसातच फायदा मिळेल.
Investment Tips: सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण (Share Market Falls) पाहायला मिळते आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या फायद्यानुसार कुठे गुंतवणूक करायला हवी याचा विचार करत आहेत. सध्या शेअर मार्केटमध्ये चढ-उतारही सुरू आहेत. या बुधवारी शेअर मार्केट 30 शेअर्सच्या बीएसई सेन्सेक्सवरून (BSE Sensex) 636.75 अंकांनी घसरला आहे आणि तोच 60,657.45 वर बंद झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (NSE Nifty) 189.60 वरून घसरून 18,042.95 वर घसरला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती कुठे आणि कशी गुंतवणूक करावी यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. परंतु सल्लागारांच्या मते तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता.