Anant Ambani Radhika Merchant Engagment : अनंत-राधिकाच्या साखरपुड्याचे Unseen Photos Viral; कुटुंबाचा आणखी एक आदर्श जगासमोर...

काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Jan 05, 2023, 12:54 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagment : काही दिवसांपूर्वीच देशातील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबांनी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच लक्षवेधी अशा रुपात हा सोहळा पार पडला. (Anant Ambani) अनंत अंबानी आणि (Rashika Merchant) राधिका मर्चंट यांच्या नात्याला एक नवं वळण मिळालं आणि तो त्या क्षणी अंबानी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

 

1/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

राजस्थानमध्ये (Rajasthan) असणाऱ्या नाथद्वारा (nathdwara) येथील श्रीनाथजी (Srinathji temple) मंदिरात हा साखरपुडा पार पडला जिथं मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. राधिका आणि अनंतला आशीर्वाद देण्यासाठी यावेळी काही पुरोहितांची उपस्थिती होती.  

2/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

सोशल मीडियावर नुकतेच या साखरपुडा सोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारी दृश्य सर्वांच्याच नजरा वळवत आहेत.   

3/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

कारण, अमाप श्रीमंती असूनही, असंख्य नोकरचाकर असूनही राधिका आणि अनंत चक्क मंदिरातील पुरोहितांना जेवण वाढताना दिसते. हे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचे, आई- वडिलांचे संस्कारच होते याचीच प्रचिती सर्वांना आली. 

4/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

फक्त पुरोहितांना जेवण वाढणंच नव्हे, तर साखरपुड्याच्या दिवशी राधिका आणि अनंतनं एका गोशाळेलाही भेट दिली. यामध्ये गाईच्या बछड्यांना राधिकानं चारा खायला दिला. 

5/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

फिकट केशरी रंगाचा शरारा ड्रेस, जाळीदार ओढणी असा एकंदर लूक राधिकानं साखरपुड्यासाठी केला होता. तर, अनंतनं रॉयल ब्लू रंगाच्या कुर्ता, बंडी अशा लूकला पसंती दिली होती. 

6/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

राधिका आणि अनंतच्या या साखरपुड्याच्या विधीनंतर अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय मुंबईत आले. 

7/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

इथं अंबानींच्या अँटिलिया या अतिभव्य निवासस्थानी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये त्या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण कलाजगताची उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

8/8

Mukesh Ambani son Anant Ambani Radhika Merchant Engagment unseen photos

(सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)