मराठी अभिनेत्रींचं कॅलेंडरसाठी खास फोटोशूट

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर गेल्या काही वर्षांपासून मराठी अभिनेत्रींच फोटोशूट करत आहे. तेजसने यावर्षी नवीन कॅलेंडरकरता अभिनेत्रींच फोटोशूट करून फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. 

Dakshata Thasale | Jan 03, 2019, 10:20 AM IST

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर गेल्या काही वर्षांपासून मराठी अभिनेत्रींच फोटोशूट करत आहे. तेजसने यावर्षी नवीन कॅलेंडरकरता अभिनेत्रींच फोटोशूट करून फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. 

 

1/6

प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या फोटोत प्राजक्ता एका नृत्यातून भगवान गणेशची पूजा करताना दिसत आहे. 

2/6

'दगडी चाळ' या सिनेमातून लोकप्रिय झालेली पूजा सावंत गणपती बाप्पाची मूर्ती साकारताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

3/6

श्रेया बुगडेला 'चला हवा येऊ द्या' या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. श्रेया लेखन कलेसोबत गणेशची पूजा करताना दिसत आहे.

4/6

नेहा महाजन हे मराठीच्या छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस नाव आहे. या फोटोत ती सितार वाजवताना दिसत आहे. सितार वाजवून ती देवी सरस्वतीची पूजा करताना दिसत आहे. 

5/6

'सिंघम रिटर्न' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठीत 'अप्सरा आली' या गाण्यामुळे अतिशय लोकप्रिय आहे. ती या फोटोच्या माध्यमातून देवी सरस्वतीची पूजा करताना दिसत आहे. 

6/6

प्रियंका बर्वे ही भारतीय पार्श्वगायिका आणि अभिनेत्री आहे. गायन आणि सितार वादनाच्या माध्यमातून ती देवी सरस्वतीची पूजा करताना दिसत आहे.