छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?

Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली.     

Oct 16, 2023, 08:41 AM IST

Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्वसाच्या मंगलपर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून, आता 9 दिवसांसाठी देवीच्या विविध रुपांची पूजा मांडली जाणार आहे. 

1/7

Navratri 2023 : छत्रपतींच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा मिळाल्यामुळं त्यांच्या सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच निराळ्या आणि खास आहेत.

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

Navratri 2023 : छत्रपतींच्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा मिळाल्यामुळं त्यांच्या सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच निराळ्या आणि खास आहेत. 

2/7

नवरात्रोत्सव

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

नवरात्रोत्सवाच्या निमित्तानंही याचीच एक झलक पाहायला मिळाली. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पूजा संपन्न झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या क्षणांची खास झलक सर्वांच्याच भेटीला आणली.   

3/7

अंबा देवघर

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

भक्तीपूर्ण वातावरणात जुना राजवाडा येथील अंबा देवघरात घटस्थापना करण्यात आली, असं त्यांनी फोटोंवरील कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी संयोगीताराजे छत्रपतीही त्यांच्यासोबत होत्या.   

4/7

धान्याच्या राशीतील आकर्षक खडी पूजा

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसास जुना राजवाडा अंबा देवघरात पहिल्या माळेला आई तुळजा भवानीची धान्याच्या राशीतील आकर्षक खडी पूजा मांडण्यात आली होती.  

5/7

कैक वर्षांचा इतिहास

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

छत्रपतींच्या कुटुंबाचा नवरात्रोत्सव हा आणखी एका  कारणासाठी खास असतो तो म्हणजे देवीची आभूषणं. कैक वर्षांचा इतिहास असणाऱ्या आभूषणांनी देवीचं रुप आणखी खुलून आल्याचं सर्वांनीच पाहिलं.   

6/7

नवरात्रोत्सवाची धूम

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

देशभरात सध्या नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत असतानाच अशा पद्धतीनं दिग्गजांकडून परंपरा जपल्या जाताना पाहून अनेकांनाच या कुटुंबाचं कुतूहलही वाटलं. 

7/7

पहिल्या दिवसाचं औचित्य

Navratri 2023 Sambhajiraje Chhatrapati devi puja kolhapur photos

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जाऊनही देवीचं दर्शन घेतलं.