Skin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..

आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.

Jan 19, 2023, 16:54 PM IST
1/5

ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने मेकअप सहज काढता येतो. याचा वापर केल्याने त्वचेवर चमकही राहते. 

2/5

ग्रीसलिनच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप देखील काढू शकता. ते वापरण्यासाठी कॉटनमध्ये ग्रीस्लीन घ्या, त्यानंतर मेकअप काढू शकता.

3/5

गुलाब पाण्याचा वापर करुन चेहऱ्यावरील मेकअप काढू शकता. यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन चेहरा स्वच्छ करा.  

4/5

नारळ तेलाच्या मदतीने मेकअप रिमूव्ह करू शकतात. तसेच चेहऱ्यावर खोबरेल तेलाने लावून ही मेकअप काढू शकता. 

5/5

कोरफड  त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच मेकअप काढण्यासाठी एलोवेरा जेल वापरू शकता.