National Walking Day 2024 : दररोज फक्त 20 मिनिटे गवतावर अनवाणी चाला, आरोग्याला मिळतील 'इतके' फायदे

National Walking Day 2024 : वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायच असेल तर सर्वात आधी मॉर्निंग वॉकची कल्पना सुचते. मॉर्निंग वॉक केल्यानंतर वजन कमी होईल असे अनेक जण आपल्याला सल्ला देत असतात. पण चालण्याची देखील योग्य पद्धत आहे. तुम्हाला माहितीय का सकाळच्या वेळेत गवतावर अनवाणी चालल्यावर आरोग्याला किती फायदे होतात?

Apr 03, 2024, 11:46 AM IST
1/7

चालणे आणि धावणे यामुळे शरीराला अनेक फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु आयुर्वेद अनेकदा वेगाने चालण्याचा सल्ला देतो. 20 मिनिटे अनवाणी गवतावर चालण्याच्या काय फायदा होतो, ते जाणून घ्या...

2/7

वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या व्यायामानुसार तुम्ही दररोज 20 मिनिटे अनवाणी गवतावर चालला तर आरोग्याला खूप फायदे मिळतील.   

3/7

सकाळी लवकर अनवाणी गवतावर चालण्यामुळे शरीराला अधिक फायदे मिळतात. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. जेव्हा तुम्ही अनवाणी गवतावर चालता तेव्हा तुमच्या पायाच्या तळव्यवरील एक्युप्रेशर पॉंईंटवर दबाव येतो आणि हा पॉंईंट शरीरावरील अवयवांना अधिक प्रभावित करतो. यामध्ये डोळ्यांचाही समावेश आहे. योग्य दाबामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.

4/7

हिरव्या गवतावर चालल्यामुळे पायाखाली असणाऱ्या नसा अधिक सक्रिय होतात आणि मेंदूला सिग्नल प्रसारित करण्याचे काम करतात. जे वारंवार होणाऱ्या ऍलर्जीपासून मुक्त होण्यास मदत करते. 

5/7

सकाळी जर तुम्ही गवतावर 20 मिनिटे चालत असाल तर तुम्हाला कोणतेही कष्ट न करता पायाचा मसाज मिळेल. हिरव्या गवतामुळे तुमच्या पायातील स्नायू अधिक आरामशीर आणि ताजेतवाने वाटतात. पायाच्या मध्यभागी थोडेसे तरी दुखत असेल तर हिरव्या गवतावर किमान 20 मिनिटे चालण्याने आराम मिळेल. 

6/7

ग्रीन मॉर्निंग वॉक घेणे मानसिक तणाव दूर करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी दररोज 20 मिनिटे गवतावर अणवानी चाला. नियमितपणे हिरवेगार गवतावर चालल्यामुळे तणाव आणि ताणपासून सुटका होईल. 

7/7

मधुमेहाच्या रुग्णाला एखादी जखम होते, ती बरी होण्यास बराच वेळ लागतो. दिवसातून 20 मिनिटे गवतावर अनवाणी चाललातर या जखमेपासून आराम मिळेल. वेगवान हालचालींमुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तुम्ही आजारांपासून दूर राहता.