..अन् शिकाऱ्यानेच गमावला प्राण! नाशिकमधील मोर अन् बिबट्याच्या मृत्यूची चर्चा; पाहा Photos

Nashik Shocking News Photos: सध्या हे फोटो नाशिकमधील पिंगळगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत असून रात्री घडलेल्या हा विचित्र अपघात थेट सकाळीच उघडकीस आला. पाहा धक्कादायक फोटो...

| Jul 22, 2024, 12:54 PM IST
1/7

leopard News Nashik

मोराला पाहून त्याची शिकार करण्यासाठी झेपावलेल्या नऊ वर्षीय नर जातीच्या बिबट्यासह मोराचा विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील पिंपळगाव शहरात घडली आहे.

2/7

leopard News Nashik

पिंपळगाव शहर परिसरात काही दिवसांपासून वावर असलेल्या बिबट्याचा दुर्देवी अंत झाला आहे. देशमाने यांच्या शेतातील चार कुत्रे त्याने फस्त केले होते.   

3/7

leopard News Nashik

याच परिसरात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या बिबट्याने शनिवारी मध्यरात्री मोराचा पाठलाग केला. मात्र मोराची शिकार करण्याच्या नादात त्यानेच जीव गमावला.

4/7

leopard News Nashik

मात्र मोर जवळ असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसला असता त्याला शॉक लागून त्याचा तिथेच मृत्यू झाला.  

5/7

leopard News Nashik

मात्र या मोराला पकडण्यासाठी बिबट्याने ट्रान्सफॉर्मरवर झेप घेताच सदर ट्रान्सफॉर्मरचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागला आणि विजेच्या धक्क्याने बिबट्याचाही मृत्यू झाला.

6/7

leopard News Nashik

वन विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मृत मोरासह 9 वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा पंचनामा केला. रात्री झालेल्या या विचित्र अपघाताची माहिती थेट सकाळीच मिळाली.

7/7

leopard News Nashik

सध्या शिकार असलेला मोर आणि शिकारी बिबट्याच्या या विचित्र मृत्यूची पिंपळगाव शहरात चांगलीच चर्चा आहे.