जेव्हा शुटिंगदरम्यान नाना पाटेकर खरोखर जळाले; 60 दिवस सुरु होते उपचार, 1 वर्ष केलं नाही काम

एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तर नाना पाटेकर तर भूमिकेत इतके शिरले होते की, आगीत जळाले होते.   

Jun 25, 2024, 18:07 PM IST

एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तर नाना पाटेकर तर भूमिकेत इतके शिरले होते की, आगीत जळाले होते. 

 

1/10

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. कोणतीही भूमिका साकारताना ते त्यात जीव ओतून काम करतात.   

2/10

एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तर नाना पाटेकर तर भूमिकेत इतके शिरले होते की, आगीत जळाले होते.   

3/10

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परिंदा' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी गँगस्टर अन्ना सेठची भूमिका निभावली होती.   

4/10

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ते आधी जॅकी श्रॉफने साकारलेली किशनची भूमिका साकारणार होते. पण अनिल कपूरने त्यांना या चित्रपटातून बाहेर काढलं.   

5/10

यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना विलनच्या भूमिकेची ऑफर दिली. नानांनी आपण ही भूमिका स्वत: लिहिणार अशी अट ठेवली.   

6/10

'परिंदा'च्या क्लायमॅक्सला अन्ना जळून ठार होतो हा सीन त्यांनीच लिहिला होता. बॉलिवूडमधील आयकॉनिक सीनपैकी असणाऱ्या या सीनमध्ये नाना पाटेकर खरोखर जळाले होते.   

7/10

नाना पाटेकर यांनी सांगितलं की, "ती आग खरंच लागली होती. मी जळत होतो. यानंतर एक वर्ष मी काही करु शकलो नाही. मी 60 दिवस हॉस्पिटलमध्ये पडून होतो".  

8/10

"माझी स्कीन जळून चप्पल आणि पायजम्यावर पडली होती. दाढी, मिशा, भुवया, पापण्या काहीच राहिलं नव्हतं".  

9/10

एका माणसाला जळण्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात असं नाना पाटेकर म्हणतात. पुढे ते म्हणाले की, 'ती एक दुर्घटना होती, जी घडून गेली. हे सर्व सुरुच असतं'.  

10/10

नाना पाटेकर 'द वॅक्सीन वॉर'मध्ये शेवटचे दिसले होते. आता ते लवकरच 'लाल बत्ती' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. तसंच गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'जर्नी' चित्रपटात दिसणार आहेत.