PHOTO : नागार्जुन यांनी दाखवलं सुनमुख; लेकाच्या साखरपुड्यातील फोटो शेअर करत दिली गोड बातमी! म्हणाले...

गेल्या बऱ्याच दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याशिवाय त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. या सगळ्यात ते आज साखरपुडा करणार आहेत असे म्हटले जात होते. त्यात आता नागार्जुननं त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.   

Diksha Patil | Aug 08, 2024, 13:58 PM IST
1/7

नागार्जुन यांनी त्यांचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्याचे फोटो नागार्जुन यांनी शेअर केले आहेत. 

2/7

नागार्जुन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

3/7

नागार्जुन यांनी हे खास फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'आम्हाला सांगताना आनंद होतोय की आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दोघांचा आज सकाळी 9:42 वाजता साखरपुडा झाला आहे.' 

4/7

पुढे नागार्जुन म्हणाले, 'शोभिता आमच्या कुटुंबात येणार असल्यानं आम्हाला खूप आनंद होत आहे. या नव्या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. त्या दोघांना आयुष्यभरासाठी खूप प्रेम आणि आनंद. देवाचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत राहो. 8.8.8 प्रेमाची एक सुंदर सुरुवात...'

5/7

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या रिलेशनशिपची चर्चा काही वर्षांपासून सुरु होत्या. ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट देखील झाले. 

6/7

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे त्यांच्या साखरपुड्यात पारंपारिक वेशात दिसले. 

7/7

नागा चैतन्यनं या आधी समांथा रुथ प्रभूशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. तर 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनी 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या Ye Maaya Chesave या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्यांचा डेब्यू चित्रपट होता.