Chanakya Niti: सकाळच्या वेळी अवश्य करा 'हे' काम; आचार्य चाणक्यांनी सांगितलाय यशाचा मंत्र

Chanakya Niti: सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाचं आयुष्य सुखी व्हावं यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

Surabhi Jagdish | Mar 29, 2024, 18:35 PM IST
1/7

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जीवनात अंगीकारल्यास माणसाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. 

2/7

चाणक्य नीतीमध्ये अशी काही कामं सांगितली आहेत, जी सकाळच्या वेळेस केली पाहिजेत. 

3/7

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने नेहमी ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. 

4/7

याचं कारण म्हणजे धार्मिक दृष्टिकोनाबरोबरच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते चांगले मानण्यात येतं

5/7

आर्चाय चाणक्य म्हणतात की, सकाळी लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे. 

6/7

ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर स्नान वगैरे करून भगवंताचे ध्यान करावे. यामुळे व्यक्तीला जीवनात अनेक सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

7/7

स्नान वगैरे झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे.