Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai Witness heavy rain  : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

| Jun 29, 2023, 14:14 PM IST
1/6

मुसळधार पावसामुळे 28 जून रोजी मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते, त्यामुळे व्यस्त अंधेरी भुयारी मार्ग बंद करावा लागला होता. आजही अंधेरी सबवेत पाणी साचले होते. 

2/6

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती देताना सांगितले की,  उपनगरी मालाडमध्ये झाड कोसळण्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर मुंबईत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. झाड पडून तिघांचा मृत्यू झाला. भायखळा येथे 22 वर्षीय तरुणी तर मालाडमध्ये 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

3/6

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांची पातळी त्यांच्या पाणलोट क्षेत्रात अपुऱ्या पावसामुळे शनिवारपासून येथे 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरुय. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढतंय. त्यामुळे मुंबईकरांची पाणीकपात टळण्याची शक्यता आहे.

4/6

संततधार पावसाने मुंबई आणि आसपासच्या भागात पाणी साचल्याचे आहे. मुंबईतील दादर परिसरात मुसळधार पाऊस पडत होता.

5/6

मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसाने मुंबई आणि आसपासच्या भागात जोरदार पाणी साचल्याचे आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर (पूर्व) परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.

6/6

ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय. राज्यात 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसलाय. जून महिना संपत आलाय तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसत नसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढलीय. पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उपस्थित झालाय. अनेक ठिकाणी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. ठाणे परिसरात गेल्या 24 तासांत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर  बदलापुरात 24 तासांत 273 मिमी पावसाची नोंद झाली आहे.