कोट्यवधी रुपयांच्या बोगस शेअर बाजार; असं चालत होते डमी मार्केट
शेअर बाजाराच्या नावानं चालवलं जात होतं डमी मार्केट. टॅक्सचोरी प्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
Mumbai Cyber Crime : मुंबई पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या बोगस शेअर बाजाराचा पर्दाफाश केला आहे. शेअर बाजाराच्या नावानं डमी मार्केट चालवलं जात होते. याला डब्बा ट्रेडिंग म्हटलं जायचं. बक्कळ परतावा देण्याचं आमिष देऊन एका छोट्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ट्रेडिंग केलं जात होतं. हवालाचा पैसा यात गुंतवला जायचा, टॅक्स चोरी केली जायची. जतिन मेहता नावाचा व्यक्ती हे सारे बेकायदेशीर व्यवहार करायचा, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.