Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द

Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.   

May 29, 2024, 18:50 PM IST
1/7

Western Railway

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

Western Railway get affected due to Palghar goods train derail : पालघर येथे झालेल्या मालगाडीच्या अपघातानंतर अनेक तास उलटूनही पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

2/7

मालगाडी

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

गुजरातहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मालगाडीचे डबे घरसल्यामुळं अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर याचे परिणाम होताना दिसत आहेत.   

3/7

रेल्वे रद्द

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार काही उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, डाऊन मार्गावरही काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वे निर्धारित वेळेहून उशिरा धावणार आहेत. 

4/7

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

पश्चिम रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या रेल्वे खालीलप्रमाणं...  09024/ 09023 वलसाड- मुंबई सेंट्रल  09284/ 09285 डहाणू रोड- पनवेल- वसई रोड मेमू  09288/ 09287 वसई रोड- पनवेल- वसई रोड मेमू  09286/ 09281 वसई रोड- पनवेल- डहाणू रोड मेमू 

5/7

पालघर रेल्वे

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

पालघर रेल्वे अपघातानंतर गाडी क्रमांक 22196 वांद्रे टर्मिनस - वीरांगना लक्ष्मीबाई झांसी जंक्शन ही ट्रेन 5 वाजून 10 मिनिटांऐवजी वांद्रे टर्मिनस येऊन 7 वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून, ती निर्धारित स्थानकांवरही दिरंगाईनं पोहोचेल अशा सूचना रेल्वे विभागानं दिल्या आहेत. 

6/7

सेवा ठप्प

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय सेवा ठप्प झाली असून, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या नोकरदार वर्गाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

7/7

युद्धपातळीवर काम

Mumbai news Western Railway these trains cancelled dahanu to virar local service completely stopped

दरम्यान रेल्वे प्रवाशांना खोळंबा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर मालगाडीचे डबे रुळांवरून काढण्याचा प्रयत्न करत असून, येत्या काळात लवकरच रेल्वेसेवा सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.