PHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?

Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का? 

Feb 14, 2024, 17:45 PM IST

Mumbai History : एखाद्या शहराचा इतिहास पाहताना काळ जसजसा बदलत गेला तसतसा या शहरांचा विकास कसा झाला हे आपल्याला कायमच थक्क करून जातं. 

 

1/8

सात बेटं

Mumbai news history of Bombay British rule impact photos

कधीकाळी सात बेटं मिळून तयार झालेलं हे शहर काळाच्या ओघात इतकं बदललं की पाहता पाहता त्याचा विस्तार जगालाही भारावून गेला. मुंबई हे शहर धाकटा कुलाबा, वरळी, माझगाव, परळ, कुलाबा, माहिम आणि बॉम्बे या बेटांपासून तयार झालं. 

2/8

भारत गाठला तेव्हा...

Mumbai news history of Bombay British rule impact photos

शहरावर 1534 मध्ये पोर्तुगीजांनी ताबा मिळवला. तर, 17 व्या शतकात इंग्रजांनी भारत गाठला तेव्हा या शहरानं त्यांचं लक्ष वेधलं. असं म्हणतात की ही मुंबई ब्रिटीशांना आहेरात मिळाली होती. त्या काळात हे शहर अस्तित्वात नसून 7 बेटं होती.   

3/8

आहेरात मिळाली मुंबई

Mumbai news history of Bombay British rule impact photos

इंग्लंडचे राजे सम्राट चार्ल्स द्वितीय यांनी 17 व्या शतकामध्ये पोर्तुगीज राजकन्या कॅथलीन डी ब्रिगेंन्झाशी विवाह केला आणि तेव्हाच पोर्तुगीजांनी हे शहर लग्नाची भेट म्हणून ब्रिटीशांना दिलं.   

4/8

ईस्ट इंडिया कंपनी

Mumbai news history of Bombay British rule impact photos

उपलब्ध माहितीनुसार ही बेटं वर्षाला 10 पाऊंड रकमेवर ईस्ट इंडिया कंपनीकडे भाड्यावर देण्यात आली होती. ज्यानंतर कंपनीनंच या बेटांना जोडून शहराचा आकार दिला. याची सुरुवात या बेटांवरील आजारांचा नायनाट करण्यापासून झाली. 

5/8

कॉजवे

Mumbai news history of Bombay British rule impact photos

1708 मध्ये माहिम आणि मुंबईच्या सायन भागाला जोडण्यासाठी कॉजवे तयार करण्यात आला. 1715 मध्ये इंग्रजांनी शहरात एक किल्ला बांधून तिथं सुरक्षेसाठी तोफा तैनात केल्या. 1772 मध्ये मुंबईत येणारी पूरस्थिती लक्षात घेता महालक्ष्मी आणि वरळी ही बेटं जोडण्यात आली. 

6/8

लहानमोठ्या टेकड्या

Mumbai news history of Bombay British rule impact photos

बेटांपासून शहर तयार करण्याच्या या प्रक्रियेमध्ये समुद्राचा काही भागही शहराशी जोडत त्यावर भर टाकत reclaimed land तयार करण्यात आलं. लहानमोठ्या टेकड्या सपाट करण्यात आल्या आणि चिखल असणाऱ्या भागांमध्ये भराव टाकण्यात आला. 

7/8

Mumbai news history of Bombay British rule impact photos

शहराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी दरी तयार करण्यात आली आणि याच शहरावर ब्रिटीशांनी 300 वर्षे राज्य केलं. मुंबईला संपूर्ण शहराचं रुप प्राप्त होण्यासाठी साधारण 19 वं शतक उजाडावं लागलं.   

8/8

सोन्याची खाण

Mumbai news history of Bombay British rule impact photos

अशी ही मुंबई आज अनेकांचं पोट भरते, कोण या शहराला 'सोने की चिडिया' म्हणतं तर कोण या शहराचा आणि येथील भरभराटीचा उल्लेख करताना सोन्याची खाण असाही करतात.