मुंबई लोकलमध्ये महिलांना मिळणार 'ही' सुविधा, सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

लेडीज कोचमध्ये 199 सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवण्यात आले आहेत. या सर्व महिला डब्यांमध्ये टॉक बॅक सिस्टीम बसवण्यात येणार आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय गाड्यांच्या 589 डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आखली आहे.

| Aug 04, 2023, 18:48 PM IST

Mumbai Local News: लेडीज कोचमध्ये 199 सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवण्यात आले आहेत. या सर्व महिला डब्यांमध्ये टॉक बॅक सिस्टीम बसवण्यात येणार आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय गाड्यांच्या 589 डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आखली आहे.

1/8

मुंबई लोकलमध्ये महिलांना मिळणार 'ही' सुविधा, सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

Mumbai Local News: मुंबईत दररोज लाखो महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कधीही प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. दरम्यान महिला सुरक्षेत आणखी वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

2/8

टॉक बॅक सिस्टीमची सुविधा

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

याअंतर्गत मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक सिस्टीमची सुविधा सुरू होणार आहे.मुंबई उपनगरीय गाड्यांमधील 771 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि 480 महिला डब्यांमध्ये टॉक बॅक सिस्टीमची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. 

3/8

589 डब्यांमध्ये सीसीटीव्ही

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

लेडीज कोचमध्ये 199 सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवण्यात आले आहेत. या सर्व महिला डब्यांमध्ये टॉक बॅक सिस्टीम बसवण्यात येणार आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय गाड्यांच्या 589 डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आखली आहे.

4/8

199 डब्यांमध्ये सीसीटीव्ही

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

सध्या मुंबई उपनगरीय गाड्यांच्या 199 डब्यांमध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे (सीसीटीव्ही) बसवण्यात आले आहेत. सध्या ३९ महिला कोचसाठी काम सुरू आहे. 

5/8

प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

इन्फ्रारेड (IR) दृष्टी सोबतच महिला प्रवाशांसाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये असलेले हे कॅमेरे महिलांवरील गुन्हे रोखण्यास मदत करतील. गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात मदत करतील आणि अलीकडेच बसवलेल्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचे थेट प्रसारण करण्याची सुविधाही आहे.

6/8

गार्डशी बोलता येणार

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

टॉक बॅक सिस्टमच्या सुविधेमुळे महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत लोकल ट्रेनच्या गार्डशी बोलता येईल. या सिस्टीममध्ये एक बटण असत. जे गार्डशी (ट्रेनच्या नॉन-ड्रायव्हिंग टोकावर केबिनचे व्यवस्थापन करणारा) सोबत इनबिल्ट मायक्रोफोनद्वारे बोलण्यासाठी दाबावे लागते.

7/8

गार्डच्या केबिनमध्ये यंत्रणा

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

गार्डच्या केबिनमध्ये एक टॉक बॅक यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी गार्डला प्रतिसाद देते आणि नंतर प्रवाशांना अडचणीत आल्यास मोटरमनला अलर्ट करते.

8/8

दोन वर्षात यंत्रणा

Mumbai Local Trains talk back system Facility start Safety of women

प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यांसह सहा महिला डबे असतात. पुढील दोन वर्षांत उपनगरीय ताफ्यातील सर्व महिला डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्याची रेल्वेची योजना आहे. पुढील दोन वर्षांत उपनगरीय ताफ्यातील सर्व महिला डब्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्याची रेल्वेची योजना आहे.