प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द

पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!

Mansi kshirsagar | May 30, 2024, 18:49 PM IST

Central Railway Mega Block: पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!

1/8

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द

mumbai local train update mega block on central railway there local trains cancelled

 मध्य रेल्वेने ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. या काळात कसं असेल मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घ्या. 

2/8

ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर 63 तासांचा विशेष ब्लॉक असेल ३०/३१ च्या मध्यरात्री १२.३० पासून २ जुन दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक  कळवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप डाऊन धीम्या आणि अप जलद मार्गावर असणार आहे.

3/8

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील 36 तासांचा ब्लॉक ३१/१ च्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार जो २ जुने दुपारी १२.३० पर्यंत असेल. सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल फेर्‍या रद्द असणार आहेत.

4/8

मध्य रेल्वेच्या या काळात 930 लोकल सेवा रद्द असणार आहेत.  शुक्रवारी १६१ गाड्या  शनिवारी ५३४ गाड्या  रविवारी २३५ गाड्या रद्द 

5/8

 विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक दरम्यान 72 मेल एक्सप्रेस बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ४४४ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट   

6/8

 मध्य रेल्वेकडून शनिवारी देखील रविवारच्या वेळापत्रकाने ट्रेन धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

7/8

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 36 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान फलाट क्रमांक 10 आणि 11 वर २४ डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे.

8/8

ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर 63 तासांचा विशेष ब्लॉक असेल ३०/३१ च्या मध्यरात्री १२.३० पासून २ जुन दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल