10 पेक्षा जास्तवेळा विनातिकिट पकडलं तर प्लॅटफॉर्मवर लागणार फोटो, पीएम मोदींचा प्लान

PM Modi Interview : भारतीय रेल्वेने फुकट्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी अनेक नियम लागू केलेत. पण यानंतरही अनेकजण रेल्वेने फकुट प्रवास करतात. आता अशा फुकट प्रवाशांवर कायमचा वचक बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास प्लान आखला आहे.

राजीव कासले | May 30, 2024, 18:48 PM IST
1/6

भारतीय रेल्वेचं जगभरात जाळं परसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण यातले काही महाभाग असेही असतात जे विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांना जेल किंवा आर्थिक दंड आकारून सोडून दिलं जातं. पण यानंतरही अशा प्रवाशांकडून पुन्हा तोच प्रकार घडतो.

2/6

फुकट्या प्रवाशांमुळे भारतीय रेल्वेचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. त्यामुळे अशा फुकट प्रवाशांवर कायमचा वचक बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास प्लान आखला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी यांनी याबाबतची माहिती दिली.

3/6

जे प्रवासी रेल्वेने फुकट प्रवास करतात, आणि दहा पेक्षा जास्त वेळा विनातिकिट पकडले जातील, त्या प्रवाशांचा फोटो प्लॅटफॉर्मवर लावला जाईल. जे गैरकृत्य करतील त्यांना यामुळे आळा बसू शकेल असं पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. 

4/6

प्लॅटफॉर्मवर फोटो लावल्यामुळे इतर प्रवाशांना फुकट्या प्रवाशाला ओळखणं सोपं होईल. प्रवासात असा एखादा फुकटा प्रवासी बसला असेल तर रेल्वेतील इतर प्रवासी याची माहिती टीटीला देतील, त्यामुळे त्याला पकडणं सोप जाईल.

5/6

भ्रष्टाचाराविरुधोत आपला लढा असून याविरोधात आपल्याला जनतेची साथ मिळेल असा विश्वास पीएम मोदी यांनी व्यक्त केलाय. कोणत्या कामासाठी एखादा लाच मागत असेल तर जनता त्याची तक्रार करेल असंही पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. 

6/6

उन्हाळी सुट्टी असल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकट रेल्वेत घुसखोरी करतात. अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी पीए मोदींनी हा खास प्लान आखला आहे.