मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन

Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे. 

| Jun 01, 2024, 12:13 PM IST
1/8

Western Railway Mega block Sunday

पश्चिम रेल्वेचा 2 जून रोजी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक हा लोकल आणि रेल्वे ट्रॅकच्या डागडुजीकरिता घेतला जातो. या दरम्यान रुळांची विशेष देखभाल घेतली जाणार आहे.   

2/8

Western Railway Mega block Sunday

 पश्चिम रेल्वेचा रविवारी सकाळी 10.35 ते 3.35पर्यंत असणार अशी घोषणा केली आहे. यामुळे आता प्रवाशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

3/8

Western Railway Mega block Sunday

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत प्रवाशांनी विनाकारण प्रवास करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. 

4/8

Western Railway Mega block Sunday

हा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन रेल्वेवर असणार आहे. त्यामुळे तिन्ही मार्गांवर प्रवास करणे टाळा. 

5/8

मध्य रेल्वे

Western Railway Mega block Sunday

मध्य रेल्वेला गुरुवारी रात्रीपासून 63 तासांचा मेगाब्लॉक सुरुच आहे. असं असताना रविवारी सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सीएसएमटी ते ठाणे या स्थानकांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

6/8

हार्बर लाईन

Western Railway Mega block Sunday

हार्बर लाईनला रविवारी 2 जून रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सीएसएमटी ते वडाळा या स्थानकांवर मेगाब्लॉक असणार आहे. 

7/8

पश्चिम रेल्वे

Western Railway Mega block Sunday

पश्चिम रेल्वेवर 2 जून रोजी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक चर्चगेट-मुंबई असा अप आणि डाऊन असेल. ही सेवा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. 

8/8

Western Railway Mega block Sunday

मध्य रेल्वेवर गुरुवारी रात्रीपासून 63 तासांचा मेगाब्लॉक आहे. हा मेगाब्लॉक सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामाकरिता घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल.