PHOTOS:…जेव्हा अवघ्या 88 रुपये दरमहा भाड्याने दिली होती अख्खी मुंबई!

Mumbai History: सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की येथे घर विकत घेणंच काय तर भाड्यानं घेणंही सर्वसामान्यांना परवडणारं नाहीय. पण ही अख्खी मुंबई अवघ्या 88 रुपयांत भाड्याने दिली गेली होती, असं कोणी सांगितलं तर?

| Mar 27, 2024, 12:56 PM IST

Mumbai Historical Facts: सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की येथे घर विकत घेणंच काय तर भाड्यानं घेणंही सर्वसामान्यांना परवडणारं नाहीय. पण ही अख्खी मुंबई अवघ्या 88 रुपयांत भाड्याने दिली गेली होती, असं कोणी सांगितलं तर?

1/8

…जेव्हा अवघ्या 88 रुपये दरमहा भाड्याने दिली होती अख्खी मुंबई!

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की येथे घर विकत घेणंच काय तर भाड्यानं घेणंही सर्वसामान्यांना परवडणारं नाहीय. पण ही अख्खी मुंबई अवघ्या 88 रुपयांत भाड्याने दिली गेली होती, असं कोणी सांगितलं तर? हो. 27 मार्च1668 ला हा व्यवहार झाला होता.

2/8

कॅथरीन डी ब्रागांझा यांच्याशी विवाह

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

साधारण 350 वर्षांपूर्वी ब्रिटीश शासक चार्ल्स II याचा पोर्तुगालच्या कॅथरीन डी ब्रागांझा यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी लग्न करताना मुंबई हुंडा म्हणून दिली होती. त्यावेळी बॉम्बे असा याचा उल्लेख केला जायचा.

3/8

6 टक्के व्याजदर

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

चार्ल्स II याने बॉम्बे हुंडा म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला दिली आणि त्या बदल्यात कंपनीने त्याला 6 टक्के व्याजदराने 50 हजार पौंड कर्ज म्हणून दिले. 

4/8

10 पौंड देण्याची अट

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

मुंबईचे भाडे म्हणून इंग्रज राज्यकर्त्यांना दरवर्षी 10 पौंड देण्याची अटही घालण्यात आली होती. 27 मार्च 1668 रोजी चार्ल्सने मुंबईची सर्व मालकी ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द केली.दर वर्षी 10 पौंड एवढी रक्कम ईस्ट इंडिया कंपनीसमोर वार्षिक भाडे म्हणून जमा करण्याच्या अटीवर मुंबई देण्यात आली. 

5/8

88 रुपये

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

याचा अर्थ महिन्याचे भाडे आताच्या रुपयानुसार 88 रुपये इतके होते. चार्ल्सने घेतलेला हा निर्णयाचा हा दिवस भारताच्या शहरीकरणाच्या युगाची पहिली सुरुवात म्हणून ओळखला जातो.

6/8

6 वर्षे लागली

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

ब्रागांझा आणि चार्ल्स यांचा विवाह 31 मे 1662 रोजी झाला होता. असे असले तरी मुंबईवर हुंडा म्हणून त्यांना दावा करता येत नव्हता. यासाठी त्यांना जवळपास 6 वर्षे लागल्याचे इतिहासकार सांगतात. 

7/8

वादाचे कारण

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

वादाचे कारण म्हणजे पोर्तुगीज राज्यकर्ते आणि ब्रिटीश लोक यांच्यातील फरक होता. त्यांना मुंबईचा नेमका कोणता भाग हुंडा म्हणून दिला गेला होता, हे ठरवता येत नव्हते.

8/8

काही भागांबाबत वाद

Mumbai History Charles gave Bombay on Rent to East India Company

तसेच नकाशात ठाण्यासह इतर काही भागांचा मुंबईचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले होते. याशिवाय इतर काही भागांबाबत वाद होता.