Antilia: मुकेश अंबानी यांच्या घराची खासियत जी तुम्हाला क्वचितच माहीत असेल? पाहा फोटो
Aug 15, 2022, 23:43 PM IST
1/6
अँटिलिया येथून मोकळे आकाश आणि समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. याशिवाय अँटिलियाच्या सहाव्या मजल्यावर गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये जवळपास 168 कार एकत्र ठेवता येतात. रिपोर्ट्सनुसार, अँटिलियाच्या 7 व्या मजल्यावर एक सर्व्हिस स्टेशनही बनवण्यात आले आहे.
2/6
अँटिलिया हे 27 मजल्यांचे घर आहे, परंतु त्याची उंची 60 मजल्या इतकी आहे. कारण अँटिलियाची छत खूप उंच बनवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबीय त्यांच्या घरातील प्रत्येक कार्यक्रम अँटिलियामध्ये करतात.
TRENDING NOW
photos
3/6
मुकेश अंबानी यांचे घर अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की हे घर 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के सहजपणे सहन करू शकेल. मुकेश अंबानींचे हे आलिशान घर पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत.
4/6
मुकेश अंबानींच्या या आलिशान घरात 9 लिफ्ट आहेत. ज्याच्या मदतीने कोणत्याही मजल्यावर जाता येते. अँटिलियामध्ये योग केंद्र, नृत्य स्टुडिओ आणि आरोग्य स्पा देखील आहे.
5/6
मुकेश अंबानी यांचे घर 4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. हे घर बांधण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
6/6
मुकेश अंबानींच्या आलिशान घर अँटिलियामध्ये कशाचीही कमतरता नाही. 27 मजल्यांच्या घरात स्विमिंग पूलपासून ते चित्रपटगृहापर्यंत सर्व सोयी आहेत. अँटिलिया घर आतून खूप सुंदर आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.