मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नाची तारीख ठरली, या दिवशी सनईचे सूर

आशियातील 12 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत ईशा अंबानी हिचे नाव आहे. कमी वयात ईशाने हे स्थान मिळविले आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी म्हणून नाही तर तिने हे मेहनतीने स्थान मिळवले आहे. 2015 मध्ये 'फोर्ब्स' मासिकाने ईशा अंबानी सर्वात तरुण अब्जाधीश महिला म्हणून दुसरे स्थान दिलेय. 

| Oct 30, 2018, 22:44 PM IST

1/4

सोमवारी, अंबानी कुटुंब विवाहाची पत्रिका घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि नीता अंबानी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. तेव्हाच डिसेंबरमध्ये विवाह होईल, असा अंदाज व्यक्त होत होता.

2/4

ईशा आणि आनंदाच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र आली होती. ईशाबरोबरच आनंदाच्या पालकांसह मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, अजय पिरामल आणि त्यांची पत्नी, मुलगा आनंद उपस्थित होते.

3/4

ईशा आणि आनंद यांचं लग्न मुंबईतच होणार आहे. ईशा आणि आनंद यांचा साखरपुडा २१ सप्टेंबरला इटलीमध्ये झाला होता. ३ दिवस हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, सोनम कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटीज गेले होते. साखरपुड्यानंतर मुकेश अंबानींनी मुंबईमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ईशा आणि आनंदचं लग्न उदयपूर किंवा उत्तरांचलमध्ये होईल, असं बोललं जात होतं.

4/4

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली आहे. ईशाचं लग्न व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलशी होणार आहे. यावर्षी १२ डिसेंबरला हे दोघं विवाहबंधनात अडकतील.12 डिसेंबरला मुंबईत अंबानी यांच्या घरी आहे. ईशा आणि आनंद यांच्या लग्नाचा बेंडबाजा वाजणार आहे. ईशा आणि आनंद लहानपणापासून चांगले मित्र राहिले आहेत. या दोघांचा साखरपुडा झाला. इटलीनंतर मुकेश अंबानी यांनीही मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली होती.