अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

Nov 20, 2020, 10:08 AM IST
1/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी Mukesh Ambani आणि त्यांची पत्नी नीता अंबानी Akash Ambani यांनी कायमच एक यशस्वी जोडी म्हणून सर्वांपुढं आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्याप्रमाणंच त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता ही जोडीसुद्धा अनेकांना कपल गोल्स देणारी ठरत आहे. आकाशची पत्नी असण्याव्यतिरिक्त श्लोकाची वेगळी ओळखही आहे.   

2/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

2016 मध्ये श्लोकानं तिची मैत्रीण मनीती मोदी हिच्यासह ConnectFor NGO ची सुरुवात केली. ज्याला एशियातील सर्वात मोठ्या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म Ketto कडून बेस्ट स्टार्टअपचा पुरस्कारही मिळाला आहे.   

3/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

हिरेव्यापारी रशेल मेहता यांची श्लोका मुलगी आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबाची सून असण्यासोबतच ती एक यशस्वी व्यावसायिकही आहे. रोजी ब्ल्यू फाऊंडेशनच्या संचालकपदीही ती काम पाहते. यासोबतच ती ConnectFor या स्वयंसेवी संस्थेची सहसंस्थापकिकाही आहे.   

4/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता हे वयाच्या चौथ्या वर्षापासून एकमेकांना ओळखतात. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून या दोघांनीही आपलं शिक्षण पूर्ण केलं. ज्यानंतर श्लोकानं न्यू जर्सीतील प्रिंसटन युनिव्हर्सिटीतून पुढील शिक्षण पूर्ण केलं. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एँड पॉलिटीकल साइंन्स मध्ये तिनं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आहे.   

5/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

श्लोका मेहता आणि आकाश अंबानीच्या नात्यामुळं दोन व्यावसायिक कुटुंब एका कायमस्वरुपी नात्यात अडकली. एका धनाढ्य कुटुंबातील मुलगी आणि सून असूनही श्लोका कायमच गरिब आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसते.   

6/6

अंबानींची सून श्लोका जगते असं आयुष्य; पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

व्यवसाय आणि एनजीओच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा श्लोका आऊटिंगसाठी जाते. पतीप्रमाणंच तिलाही महागड्या गाड्यांची आवड आहे. श्लोकाकडे स्वत:ची बेंटले कार आहे. या कारची किंमत 4 कोटी रुपये इतकी आहे. मिनी कूपर आणि मर्सिडीज अशा कारही तिच्याकडे आहेत.