मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात 'हे' पदार्थ, पैसे असूनही...

Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे. या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय. 

नेहा चौधरी | Jul 09, 2024, 13:16 PM IST
1/7

श्रीमंत आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींकडे पैसेच पैसे आहे. अशात नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण एका महाराजाच्या सारखं शाही जेवण ते जेवत असतील असा समज आहे. 

2/7

नीता अंबानी यांनी स्वतः मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खातात? याबद्दल खुलासा केलाय. 

3/7

नीता अंबानी यांनी सांगितलं की, संपूर्ण अंबानी कुटुंबाला घरी बनवलेले जेवण आवडतं. तर मुकेश अंबानी हे शुद्ध शाकाहारी आहाराचं पालन करतात. त्याशिवाय ते आठवड्यातून एकदाच बाहेर खातात. नीता अंबानी यांनी सांगितलं की, मुकेश अंबानी यांना गुजराती पंकी हा पदार्थ खूप आवडतो. 

4/7

मुकेश अंबानी रोज पहाटे 5.30 वाजता उठतात. योगा आणि ध्यान करुन त्यांची दिवसाची सुरुवात होते. योगानंतर सूर्यनमस्कार करता. त्यानंतर वॉक करतात. 

5/7

मुकेश अंबानी नाश्तात हलका आणि पौष्टिक आहार घेतात. फळं, ज्यूस आणि इडली-सांबर घेतात. शिवाय ते अतिरेक अन्नपदार्थांचं सेवन चुकूनही करत नाहीत. 

6/7

दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचे ते डाळ, भाज्या, भात, सूप आणि सॅलडचा समावेश असतो. त्यांना पारंपारिक भारतीय जेवण आवडतं. 

7/7

मुकेश अंबानी यांना कामानिमित्त अनेक शहरात आणि समारंभाना जावं लागतं. पण ते शाकाहारीच जेवण जेवतात आणि जंक फूडपासून दूर राहतात.