चेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'

CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.

| Aug 17, 2024, 15:59 PM IST
1/5

आयपीएल 2025

आयपीएल संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात मुंबईमध्ये मिटिंग पार पडली. यामध्ये संघमालकांनी बीसीसीआयकडे अनेक मागण्या केल्या होत्या. यामध्ये चेन्नईने अनकॅप्ड प्लेयरची मागणी केल्याची माहिती समोर आली होती.

2/5

चेन्नई सुपर किंग्ज

त्यावर आता चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठा खुलासा केला आहे. नियम लागू झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकेल, अशी शक्यता होती. मात्र, खुद्द सीईओ यांनी मोठं वक्तव्य केलंय.

3/5

चेन्नईचे सीईओ

'मला याबाबत कोणतीही कल्पना नाहीये. आम्ही अशी कोणतीही मागणी केली नाहीये. बीसीसीआयनेच आम्हाला सांगितलंय की अनकॅप्ड प्लेयर नियम पुन्हा लागू केला जाऊ शकतो', असा खुलासा चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी केला आहे. 

4/5

नियम आणि नियमन

फक्त एवढीच माहिती समोर आहे. त्यांनी अशी अद्याप कोणतीही घोषणा केली नाहीये. नियम आणि नियमन ठरवण्याचं काम बीसीसीआयचं आहे आमचं नाही, असं स्पष्ट उत्तर सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिलंय.

5/5

सर्वाधिक फायदा चेन्नईला

दरम्यान, अनकॅप्ड प्लेयरचा हा नियम लागू केला तर त्याचा सर्वाधिक फायदा चेन्नईला होणार आहे. मेगालिलावापूर्वी चेन्नई धोनीला कायम संघासोबत ठेऊ शकणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष असेल.