तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या 'या' कोडवरुन लक्षात ठेवा

लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा असेल तर भारतातील 70- 80 टक्के जनता रेल्वेवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

Mansi kshirsagar | Aug 17, 2024, 15:44 PM IST

Waiting Ticket Rules: लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा असेल तर भारतातील 70- 80 टक्के जनता रेल्वेवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

1/8

तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या 'या' कोडवरुन लक्षात ठेवा

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळं कधी कधी तिकिट मिळवण्यासाठीदेखील खूप प्रयत्न करावा लागतो. कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. 

2/8

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

 रेल्वेचे काही कोड असतात ज्यामुळं तुमचं वेटिंग लिस्टमध्ये असलेले तिकिट कन्फर्म होईल का? हे तुम्ही जाणून घेऊ शकता. वेटिंग तिकिटवर लिहलेले हे कोड नेमके काय आहेत. हे सर्व जाणून घेऊया.   

3/8

RAC (Reservation Against Cancelation)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

 RAC म्हणजे तुम्हाला तिकिट मिळालं आहे. तुम्ही प्रवास करु शकता मात्र, तुमची सीट दोघांमध्ये वाटली जाईल. तुम्ही सीटवर बसू शकता मात्र स्लीपर कोच मिळू शकत नाही

4/8

GNWL (General Waiting List)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

GNWL. याचा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट. GNWL कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण ज्या स्थानकातून ट्रेन सुटणार आहे तिथे सर्वाधिक बर्थ असतात. 

5/8

RLWL (Remote Location Waiting List)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

 प्रवाशांना वेटिंग तिकिट तेव्हा दिलं जातं. जेव्हा तिकिट पहिल्या व शेवटच्या स्थानकांव्यतिरिक्त मार्गातील आसपासच्या स्थानकांसाठी बुक केले जाते. GNWLच्या तुलनेत हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते. 

6/8

PQWL (Pooled Quota waiting List)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

 ट्रेनमध्ये मधल्याच एखाद्या स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी असते. 

7/8

TQWL (Tatkal Quota Waiting List)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

तात्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकिट न मिळणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता नसतेच

8/8

RSWL (Road Side Waiting List)

indian railways waiting list check train ticket code get confirm ticket

ट्रेनच्या मूळ स्थानकावरून जवळच्या स्थानकांवर तिकीट बुक केले जाते. अशी तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.